रॉटरडॅम : भारतीय पुरुष हॉकी संघाच्या एफआयएच प्रो लीगचे विजेतेपद पटकावण्याच्या आशा रविवारी मावळल्या. दुसऱ्या सामन्यात नेदरलँड्सकडून 1-2 असा भारताचा पराभव झाला. शनिवारी सलामीच्या लढतीत भारताला नेदरलँड्सकडून 1-4 ने पराभव पत्करावा लागला होता. कारण दोन्ही संघ नियमित वेळेच्या 60 मिनिटांनंतर 1-4 असे बरोबरीत होते.
जेतेपदाच्या माफक आशा कायम ठेवण्यासाठी भारताला नेदरलँड्सविरुद्ध विजयाची नोंद करणे आवश्यक होते पण तसे झाले नाही. नेदरलँड्सने 14 सामन्यांत 35 गुणांसह पुरूषांचे विजेतेपद पटकावले तर दोन सामने अजून खेळायचे आहेत.
ऑलिम्पिक चॅम्पियन बेल्जियम 16 सामन्यांत 35 गुणांसह दुसऱ्या तर भारत 16 सामन्यांत 30 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. अभिषेकच्या गोलमुळे भारताने सामन्याची शानदार सुरुवात केली आणि 30 सेकंदात आघाडी घेतली. अभिषेकने उजव्या एंडकडून चेंडूचा ताबा घेतला आणि चार बचावपटूंना हूल दिल्यानंतर डच संघाचा दुसऱ्या पसंतीचा गोलरक्षक मॉरिट्झ विसेरला चकवा देऊन त्याने गोल केला. नेदरलँड्सने मात्र सातव्या मिनिटाला झिप जेन्सेनच्या पेनल्टी कॉर्नरवर बरोबरी साधली.