रांची : कर्णधार हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिकेतील पहिला टी-20 सामना संध्याकाळी 7 वाजता खेळणार सुरू झाला. महेंद्रसिंग धोनीच्या होम टाऊनमध्ये होणाऱ्या या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली या ज्येष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने भारतापुढे 177 धावांचे लक्ष्य दिले होते. परंतु, भारतीय संघाची सुरुवात अत्यंत खराब झाल्याने वेगात धावा करण्याच्या नादात फलंदाज एका मागोमाग तंबूत परतले. वाॅशिंग्टन सुंदरने छान फलंदाजी करीत सामन्यात रंगत आणली. परंतु, 155 धावांपर्यंत टीम इंडिया पोहचली.
न्यूझीलंडचा डाव : फिनन अॅलेन आणि काॅन्वेने दमदार सुरुवात करीत न्यूझीलंड संघाच्या धावसंख्येला आकार दिला. न्यूझीलंडने दमदार फलंदाजी करीत 176 धावसंख्या उभारली. ओपनर आलेल्या फिनन अॅलेनने 35 तर काॅन्वेने 52 धावा करीत जोरदार सुरुवात केली. डॅरेल मायकेलने 59 धावांची भक्कम खेळी करीत मोठी धावसंख्या उभारली.
भारतीय संघाची घसरती फलंदाजी :भारतीय संघाची सुरुवातच अत्यंत खराब झाली. भारताच्या डावाची सुरुवात 11 धावांवर 3 गडी बाद करून झाली. भारतीय फलंदाज घसरत राहिली. वाॅशिंग्टन सुंदरने अत्यंत चुरशीची खेळी करीत एकहाती लढत दिली. त्याने 28 चेंडूत 50 धावांची मोठी खेळी केली. परंतु, एकामागोमाग खेळाडू बाद होत राहिले.
गिल आणि किशन करणार डावाची सुरुवात :गिल आणि किशन करणार डावाची सुरुवात, असे कर्णधार हार्दिक पंड्याने सांगितले की, शुभमन गिलने गेल्या चार डावांमध्ये द्विशतकासह तीन शतके झळकावली आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत सलामीवीर शुभमन गिलला पृथ्वी शॉपेक्षा प्राधान्य दिले जाईल, असे पंड्याने गुरुवारी सांगितले. गिलवर संघाचा पूर्ण विश्वास आहे. कर्णधार म्हणाला, 'गिल आणि ईशान किशन डावाची सुरुवात करतील. शुभमनने चमकदार कामगिरी केली असून तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे.