नागपूर :भारताने 400 धावांवर डाव घोषित केल्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेला ऑस्ट्रेलियाचा संघ दयनीय स्थितीत पोहचली. रविचंद्रन अश्विनची फिरकीची जादू काही थांबायचे नाव घेत नाही. अश्विनने ऑस्ट्रेलिया संघाची वरची फळी अक्षरशः कापून काढली. त्यानंतर उरलेली कामगिरी जडेजा आणि शमीने चोख बजावत उरले-सुरलेले फलंदाज तंबूत पाठवले. ऑस्ट्रेलिया अवघ्या 91 धावांवर ऑलआऊट झाल्याने भारताने 1 डाव राखून 132 धावांना दणदणीत विजय मिळवला.
भारतीय गोलंदाजांची शानदार गोलंदाजी :ऑस्ट्रेलियन फलंदाज एकामागोमाग तंबूत परतत होते. इकडे रविचंद्रन अश्विनच्या माऱ्यापुढे कांगारू हैराण झाले होते. डेव्हीड वाॅर्नरला रविचंद्रनने एलबीडब्ल्यू केल्यानंतर तिकडे जडेजानेसुद्धा मारनेस लबुनशेनला पायचीत केले. मॅट रेनशाॅ ( 2) अवघ्या 2 धावांवर अश्विनकडून पायचित झाला. पेटर हॅंडकोम्बलासुद्धा काही सुधारले नाही, तो 6 धावांवर असताना अश्विनने त्याला एबबीडब्ल्यू केले. एलेक्स केरी (10) सुद्धा एलबीडब्ल्यू करून तंबूत पाठवले. त्यानंतर जडेजा, शमी, यांनीसुद्धा त्यांची कामगिरी चोख बजावत बाकीच्या फलंदाजांना पॅव्हीलीनचा रस्ता दाखवला.
भारतीय संघाचा डाव :दुसऱ्या दिवसाचा (शुक्रवार) खेळ संपेपर्यंत भारताने सात विकेट्सवर 321 धावा केल्या होत्या आणि ऑस्ट्रेलियावर 144 धावांची आघाडी घेतली होती. आज रवींद्र जडेजा (66) आणि अक्षर पटेल (52) खेळत होते. रवींद्र जडेजाने शानदार खेळी करीत 185 चेंडूत 70 धावा केल्या, तर अक्षर पटेलने 184 चेंडूत 84 धावांची मोठी खेळी केली. त्यामुळे भारतीय संघाच्या धावसंख्येला आकार आला. आज भारतीय संघाचा डाव 400 धावांवर संपुष्टात आला.
जडेजा आणि अक्षर पटेलच्या जोडीची उत्तम फलंदाजी :जडेजाने 18वे आणि पटेलने दुसरे अर्धशतक झळकावले. रवींद्र जडेजाने 114 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या. जडेजाचे हे कसोटीतील 18 वे अर्धशतक आहे. पाच महिन्यांनंतर कसोटीत पुनरागमन करणाऱ्या जडेजानेही पाच बळी घेतले आहेत. अक्षर पटेलने 94 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या. पटेलचे हे कसोटीतील दुसरे अर्धशतक आहे. रवींद्र जडेजाने 185 चेंडूत 70 धावा, तर अक्षर पटेलने 174 चेंडूत 84 धावा केल्या.