नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा तिसरा कसोटी सामना धर्मशालाऐवजी इंदूर येथे घेण्याचा निर्णय झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली. भारतीय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने धर्मशाला स्टेडियमचे मैदान आणि खेळपट्टी सामन्यासाठी योग्य नसल्याने स्थान बदलण्याचा निर्णय घेतला. आता हा सामना होळकर स्टेडियम, इंदूर होणार असल्याचे जाहीर केले. तेथील मैदान आणि खेळपट्टीची स्थिती योग्य नसल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने हा निर्णय घेतल्याचे बोलले जाते.
बीसीसीआयने दिली माहिती : 13 फेब्रुवारी रोजी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) एक मीडिया अॅडव्हायझरी जारी करून माहिती दिली की, गावस्कर ट्रॉफीचा तिसरा कसोटी सामना (IND vs AUS 3री कसोटी) आता धर्मशालाऐवजी होळकर स्टेडियम, इंदूर येथे खेळवला जाणार आहे. मैदान आणि खेळपट्टीची स्थिती पाहता सामना आयोजित करण्यासाठी योग्य नसल्याने हवामानाची स्थिती पाहून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता ही कसोटी इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळवली जाईल, असा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मीडिया अॅडव्हायझरीद्वारे जाहीर केले.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचे वेळापत्रक : दुसरी कसोटी - १७ ते २१ फेब्रुवारी, अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली; तिसरी कसोटी - १ ते ५ मार्च, होळकर स्टेडियम, इंदूर; चौथी कसोटी - ९ ते १३ मार्च, नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला फक्त कसोटी सामन्यातील तिसरा सामन्याचे स्थान बदलावे लागले. हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जाणारा सामना आता होळकर स्टेडियम, इंदूर येथे होणार आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये भारताला आशा : जगभरातील क्रिकेट चाहते अनेक दिवसांपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम तारखांची वाट पाहत आहेत. केव्हा फायनल सामन्याची तारीख जाहीर होते याकडे क्रिकेट शौकीनांचे लक्ष असणार आहे. हा मोठा सामना इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. आयसीसीने बुधवारी तारीख जाहीर केली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारी बॉर्डर-गावस्कर मालिका जर भारताने क्लिन स्वीपने जिंकली तर भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यामध्ये खेळू शकतो.