दुबई:भारताने बांगलादेशकडून (India vs Bangladesh) पहिला कसोटी सामना जिंकल्यानंतर फलंदाज आणि गोलंदाजांच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे. रोहित शर्मा आयसीसी कसोटी क्रमवारीत 9व्या स्थानावर पोहोचला आहे. (ICC Test Rankings Rohit Sharma) बांगलादेशविरुद्धच्या चितगावमधील पहिल्या कसोटीत 90 आणि नाबाद 102 धावा करणाऱ्या चेतेश्वर पुजारालाही त्याचा चांगलाच फायदा झाला आहे. त्याने 19 स्थानांची झेप घेतली, त्यामुळे तो आता 16व्या स्थानावर पोहोचला आहे.
पुजारा व्यतिरिक्त शुभमन गिललाही फायदा झाला असून, तो 56व्या स्थानावर पोहोचला आहे. याशिवाय श्रेयस अय्यरही २६व्या स्थानावर पोहोचला आहे. कसोटी क्रमवारीतील गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले, तर कागिसो रबाडाने पहिल्या 10 खेळाडूंमध्ये स्थान मिळवले आहे. तो 4 स्थानांची झेप घेत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. रबाडाच्या उसळीमुळे जसप्रीत बुमराह आणि रविचंद्रन अश्विन अनुक्रमे 4 आणि 5 व्या क्रमांकावर पोहोचले आहेत.