नवी दिल्ली : सूर्यकुमार यादवने 2022 या वर्षात चमकदार कामगिरी करीत ( Smriti Mandhana forT20 Cricketer of The Year Award ) टी-20 मध्ये आपली छाप सोडली आहे. तो 2022 ( ICC Nominates Suryakumar Yadav ) मध्ये 187.43 च्या स्ट्राइक रेटने 1164 धावा करून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला ( ICC Nominates Suryakumar Yadav and Smriti Mandhana ) आहे. त्याच्याशिवाय ( T20I Cricketer of Year award ) इतर तीन खेळाडू सॅम कुरन, सिकंदर रझा आणि मोहम्मद रिझवान हेदेखील आयसीसी पुरस्काराच्या शर्यतीत आहेत. त्याने या वर्षी टी-20 मध्ये 68 षटकार मारले. वर्षात दोन शतके आणि नऊ अर्धशतकांसह यादव टी-20 फलंदाजांमध्ये अव्वल आहेत.
टी-२० विश्वचषकात सूर्यकुमारने सहा डावांत तीन अर्धशतकेऑस्ट्रेलियात झालेल्या टी-२० विश्वचषकात सूर्यकुमारने सहा डावांत तीन अर्धशतके झळकावली. या स्पर्धेनंतरही त्याने आपला प्रभावी फॉर्म कायम ठेवला आणि न्यूझीलंडमधील द्विपक्षीय मालिकेतील दुसरे शतक झळकावले. या वर्षीही त्याने 890 रेटिंग गुण मिळवून आयसीसी टी-20 क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. झिम्बाब्वेच्या सिकंदर रझानेही T20 मध्ये बॅट आणि बॉलने चमकदार कामगिरी केली.त्याने वर्षभरात 150 च्या स्ट्राइक रेटने 735 धावा केल्या. रझाने 6.13 च्या इकॉनॉमीसह 25 विकेट्स घेतल्या. टी-20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धच्या विजयात त्याचा मोठा वाटा होता.