नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात ते टोकियो पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या खेळाडूंसोबत चर्चा करताना पाहायला मिळत आहे. तसेच ते खेळाडूंचे अभिनंदन करताना पाहायला मिळत आहेत.
भारतीय पॅरा अॅथलिटनी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये चांगली कामगिरी केली. भारताने या स्पर्धेत 19 पदके जिंकली. यात 5 सुवर्ण, 8 रौप्य आणि 6 कास्य पदक जिंकले. भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्कृष्ठ कामगिरी आहे. या कामगिरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळाडूंची भेट घेत त्यांचे कौतुक केले होते. या भेटीचा व्हिडिओ आता मोदींनी शेअर केला आहे.
मोदी म्हणाले की, तुमची कामगिरी देशातील संपूर्ण क्रीडा क्षेत्राचे मनोबल वाढवेल. तसेच नवख्या खेळाडूंना यातून प्रेरणा मिळेल. त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर आपलं नाव कमावण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. पण देशातील एका वर्गाला अजूनही खेळातील जास्त माहिती नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सोबत खेळाडूंनी आपलं अनुभव शेअर केला. यावेळी खेळाडूंनी स्वाक्षरी केलेला उपरणे भेट म्हणून दिले.
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणारे खेळाडू -
अवनी लेखरा, प्रमोद भगत, कृष्णा नागर, सुमित अंतिल आणि मनिष नरवाल.