नवी दिल्ली - कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे संपूर्ण जग संकटात सापडले आहे. भारतातही या व्हायरसची प्रकरणे वाढत आहेत. यावर कुस्तीपटू बबीता फोगाट हिने जमातवासिंना जाहिल म्हणत एक ट्विट केले होते. या ट्विटमुळे बबिताला ट्रोल करण्यात आले. इतकेच नव्हे तर तिला धमकीही देण्यात आली.
यानंतर, बबिताने आपले स्पष्टीकरण दिले आहे. ती म्हणाली, “मी जायरा वसिम नाही जी धमकीमुळे घरात बसेल. मी नेहमी लढेन”. जायरा ही बॉलिवूड अभिनेत्री असून तिने कट्टरपंथीयांच्या धमक्यांमुळे चित्रपटसृष्टीला अलविदा केले होते. जायराने दंगल आणि सिक्रेट सुपरस्टार या चित्रपटांमध्ये काम केले आहे. दंगल चित्रपटात तिने बबिताची मोठी बहिण गीता फोगाटची बालपणीची भूमिका साकारली होती.