महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Hockey World Cup 2023 : नेदरलँड्सने मलेशियाचा 4-0 ने धुव्वा उडवला - नेदरलँड्स विरुद्ध मलेशिया

यंदाच्या विश्वचषकात जेतेपदाच्या प्रबळ दावेदारांपैकी एक असलेल्या नेदरलँड्सने आपल्या पहिल्या सामन्यात मलेशियाचा 4-0 असा पराभव केला. या विजयानंतर नेदरलँड्सची टीम क गटात अव्वल स्थानी पोहचली आहे.

Netherlands vs Malaysia
नेदरलँड्स विरुद्ध मलेशिया

By

Published : Jan 14, 2023, 7:38 PM IST

राउरकेला (ओडीशा) : हॉकी विश्वचषक 2023 च्या दुसऱ्या दिवशी तीन वेळच्या चॅम्पियन नेदरलँड्सने मलेशियाचा 4-0 असा पराभव करत आपल्या अभियानाला जोरदार सुरुवात केली. क गटातील या दोन संघांमध्ये राउरकेला येथील बिरसा मुंडा स्टेडियमवर हा सामना झाला.

नेदरलँड्सची संथ सुरुवात, नंतर केले हल्ले : 1973, 1990 आणि 1998 च्या विश्वचषकात विजेतेपद पटकावणाऱ्या हॉलंडने दुसऱ्या क्वार्टरमध्ये दोन गोल केले. त्यांनी तिसऱ्या क्वार्टरमध्ये काही चांगले हल्ले केले आणि नंतर चौथ्या क्वार्टरमध्ये आणखी दोन गोल केले. प्रशिक्षक जेरोन डेल्मी यांच्या संघाने सामन्यात संथ सुरुवात केली होती. पहिल्या क्वार्टरमध्ये गोलशून्य बरोबरी राखल्यानंतर थिज व्हॅन डॅमने 19व्या मिनिटाला मैदानी गोल करून खाते उघडले. चार मिनिटांनंतर जिप जॅन्सेनने पेनल्टी स्ट्रोकने गोल करत डच संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली.

हेही वाचा :Hockey World Cup 2023 : भारताची विजयी सुरुवात, स्पेनचा 2-0 ने केला पराभव

नेदरलँड्स जेतेपदाच्या प्रबळ दावेदारांपैकी एक : तिसऱ्या कॉर्टरमध्ये मलेशियाला तीन पेनल्टी कॉर्नर मिळाले, मात्र त्यांना या संधींचा फायदा उठवता आला नाही. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या नेदरलँड्सने चौथ्या क्वार्टरमध्ये 46व्या मिनिटाला गोल केला. ट्युन बेन्सने टीमला मिळालेल्या दुसऱ्या पेनल्टी कॉर्नरवर हा गोल केला. नेदरलँड्सची टीम या विश्वचषकात जेतेपदाच्या प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. अंतिम हूटरच्या काही सेकंदाआधीच जोरीट क्रोनने नेदरलँड्ससाठी चौथा गोल करत टीमचा स्कोअर 4-0 असा केला. सामन्यात नेदरलँड्सने तीन पेनल्टी कॉर्नर मिळवले आणि एका पेनल्टी स्ट्रोकवर जॅन्सेनने गोल केला. मलेशियाला तीन पेनल्टी कॉर्नर मिळाले पण सर्व व्यर्थ गेले.

क गटात डच टीम गोल फरकाच्या आधारे न्यूझीलंडच्या पुढे आहे. दोन्ही संघांचे त्यांच्या पहिल्या सामन्यानंतर तीन गुण आहेत. मात्र नेदरलँडचा गोल फरक +4 आहे तर न्यूझीलंडचा गोल फरक +2 आहे.

हेही वाचा :India vs Sri lanka 2nd ODI : भारताचा श्रीलंकेवर चार गड्यांनी विजय ; केएल राहुल, सिराज आणि कुलदीपची चमकदार कामगिरी

ABOUT THE AUTHOR

...view details