भोपाल:हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप ( Senior Women National Championship ) 2022, 6 मे पासून सुरू होणार आहे. 12 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत एकूण 27 संघ अव्वल पुरस्कारासाठी स्पर्धा करतील. सहभागी संघांची आठ गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. हॉकी मध्य प्रदेश, हॉकी चंदीगड आणि हॉकी बिहार ए गटामध्ये आहेत, तर हॉकी हरियाणा, हॉकी आसाम आणि हॉकी बंगाल बी गटामध्ये आहेत. हॉकी पंजाब, छत्तीसगड हॉकी आणि त्रिपुरा हॉकीचा समावेश सी गटामध्ये आहे. त्याच वेळी, हॉकी महाराष्ट्र, हॉकी राजस्थान आणि हॉकी उत्तराखंडचा समावेश डी गटामध्ये आहे.
हॉकी झारखंड, हॉकी आंध्र प्रदेश आणि पुद्दुचेरी हॉकीचा ई गटामध्ये समावेश करण्यात आला आहे. तर हॉकी कर्नाटक, तामिळनाडूचे हॉकी युनिट आणि हॉकी अरुणाचल, हॉकी अंदमान आणि निकोबार यांना एफ गटामध्ये स्थान देण्यात आले आहे. गट जी मध्ये उत्तर प्रदेश हॉकी, दिल्ली हॉकी, गोवा हॉकी आणि हॉकी गुजरातचा समावेश आहे. तर ओडिशा हॉकी असोसिएशन, केरळ हॉकी, तेलंगणा हॉकी आणि हॉकी हिमाचल यांना गट एच मध्ये ठेवण्यात आले आहे.
विजेतेपद राखण्याच्या शक्यतेवर बोलताना हॉकी मध्य प्रदेशच्या प्रशिक्षक वंदना ( Hockey Madhya Pradesh Coach Vandana ) म्हणाल्या, मला वाटते की आम्ही मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे तयार आहोत. प्रत्येक सामन्यात चांगली कामगिरी करून उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरणे हे आमचे ध्येय आहे. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी खेळाडू उत्सुक आहेत.