भुवनेश्वर : हॉकी इंडियाने भारतीय पुरुष आणि महिला संघांचे मनोबल वाढवण्यासाठी नवीन धोरण जाहीर ( Hockey India has Announced New Policy ) केले आहे. ज्यामध्ये खेळाडूंना वार्षिक रोख पारितोषिकांची हमी ( Indian Hockey Players Assured of Annual Cash Prize ) दिली जाईल. खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी हॉकी इंडिया रोख बक्षिसे ( New Policy will Prove to be Helpful For Players ) देणार आहे. सामना जिंकल्यानंतर प्रत्येक खेळाडूला 50 हजार आणि सपोर्ट स्टाफला 25 हजार रुपये दिले जातील. नवीन धोरण खेळाडूंसाठी, विशेषत: कठीण आर्थिक पार्श्वभूमीतून आलेल्या खेळाडूंसाठी उपयुक्त ठरेल.
संघातील खेळणाऱ्या प्रत्येक सदस्यासाठी असेल बक्षीस : हा पुरस्कार संघातील खेळणाऱ्या सदस्यांसाठी असेल. हॉकी इंडियाने 10व्या सुलतान जोहोर कप जिंकणाऱ्या प्रत्येक खेळाडूला 2 लाख रुपये आणि भारतीय कनिष्ठ पुरुष संघाच्या सपोर्ट स्टाफला प्रत्येकी 1 लाख रुपये दिले. नवीन उपक्रमाबद्दल बोलताना हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की म्हणाले की, HI ने सर्वानुमते रोख प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघातील प्रत्येक खेळाडूला प्रत्येक विजयासाठी प्रत्येकी 50,000 रुपये दिले जातील.