नवी दिल्ली:भारतीय महिला हॉकी संघ (Indian Women's Hockey Team) सध्या ओमानच्या मस्कट येते सुरु असलेल्या महिला आशिया कप 2021 मध्ये सहभागी आहे. या स्पर्धेत बुधवारी कोरिया विरुद्ध भारताचा सेमीफाइनल सामना खेळला गेला. या सामन्यात भारताची महिला हॉकी खेळाडू गुरजीत कौर हिने आपले 100 आंतरराष्ट्रीय सामने पूर्ण केले (Gurjeet Kaur completes 100 international matches) आहेत. या तिच्या कामगिरी निमित्त हॉकी इंडियाने तिला शुभेच्छा दिल्या आहेत. गुरजीत कौर हिने मलेशिया विरुद्ध पदार्पण केले होते. गुरजीत कौर ही भारतीय संगाची महत्वाची खेळाडू आहे आणि यासाठी तिने खुप मेहनत घेतली आहे.
अलीकडच्या भारतीय संघाच्या यशात गुरजीत कौरचे महत्वाचे योगदान राहीले आहे. खासकरुन 2017 मध्ये झालेल्या 9व्या महिला आशिया कपमध्ये सर्वात जास्त गोल करणारी तिसरी खेलाडू ठरली होती.
गुरजीत कौरने 2018 मध्ये भारतीय संघाने जिंकलेल्या रौप्य पदकामध्ये (Silver medal won by Indian team) महत्वपूर्ण योगदान दिले होते. कौरने एफआईएच महिला विश्व कप लंजन मध्ये भारताच्या पहिल्या क्वार्टर फाइनल मध्ये आणि त्याचबरोबर आशियाई खेळात 2018 मध्ये भारताच्या ऐतिहासिकरौप्य पदकामध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावली होती. राष्ट्रमंडल खेळ 2018 मद्ये उल्लेखनीय विजय मिळवणाऱ्या संघाचा भाग होती, जे एका पदकापासून चुकली होती. 2019 मध्ये ती जपानच्या हिरोशिमा मध्ये आयोजित एफआयाएच महिला सीरीज फाइनल मध्ये अग्रगण्य गोल स्कोरर होती, जिथे टीमने सुवर्ण पदक जीता होते आणि त्यांनी भुवनेश्वर मध्ये 2019 ऑलिम्पिक क्वालीफायर मध्ये देखील भाग घेतला होता. जिथे भारताने संयुक्त राज्य अमेरिकेला 6-5 च्या फरकाने पराभूत केले होते.