नवी दिल्ली - भारतीय धावपटू आणि ‘ढिंग एक्स्प्रेस’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या हिमा दासने कोरोना व्हायरसशी लढा देण्यासाठी आपला एक महिन्याचा पगार देण्याचा निर्णय घेतला आहे. हिमा तिचा पगार आसाम सरकारच्या COVID-१९च्या मदत निधीमध्ये देईल. हिमाने ट्विटरवर याबाबत माहिती दिली.
‘ढिंग एक्स्प्रेस’ची कोरोनाविरूद्धच्या लढाईसाठी मदत जाहीर - हिमा दास लेटेस्ट न्यूज
हिमा दासने कोरोना व्हायरसशी लढा देण्यासाठी आपला एक महिन्याचा पगार देण्याचा निर्णय घेतला आहे.
‘ढिंग एक्सप्रेस’ची कोरोनाविरूद्धच्या लढाईसाठी मदत जाहीर
हिमाने आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, आसामचे मुख्यमंत्री सबार्नंद सोनोवाल, केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू आणि आसामचे आरोग्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांना टॅग केले. ‘मित्रांनो, एकत्र येऊन उभे राहण्याची आणि मदत करण्याची ही वेळ आहे. COVID-१९पासून लोकांचे आरोग्य सुरक्षित राहावे, यासाठी मी आसाम आरोग्य निधी खात्यात माझा एक महिन्याचा पगार देत आहे’, असे तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.