गुवाहाटी - भारताची महिला धावपटू हिमा दासने कोरोनाच्या संकटाला गांभीर्याने घेण्याचे आवाहन केले आहे. शुक्रवारी या व्हायरसचा आसाममध्ये पहिला बळी नोंदवण्यात आला. त्यानंतर, हिमाने हे आवाहन केले आहे.
महिला धावपटू हिमा दास म्हणते, “कोरोनाला गांभीर्याने घ्या” - latest news about hima das
हिमाने ट्विटरद्वारे हे आवाहन केले. ती म्हणाली, “आसामच्या लोकांनो कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची बातमी ऐकून मला फार वाईट वाटले आहे. मी आपणा सर्वांना हे साथीचे गांभीर्याने घेण्याचे आवाहन करते. आमचे डॉक्टर, पोलिस, स्वच्छता आणि सर्व कर्मचारी आपला जीव धोक्यात घालत आहेत. घरी राहा सुरक्षित रहा.”
महिला धावपटू हिमा दास म्हणते, “कोरोनाला गांभीर्याने घ्या”
हिमाने ट्विटरद्वारे हे आवाहन केले. ती म्हणाली, “आसामच्या लोकांनो कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची बातमी ऐकून मला फार वाईट वाटले आहे. मी आपणा सर्वांना हे साथीचे गांभीर्याने घेण्याचे आवाहन करते. आमचे डॉक्टर, पोलिस, स्वच्छता आणि सर्व कर्मचारी आपला जीव धोक्यात घालत आहेत. घरी राहा सुरक्षित रहा.”
आसामचे आरोग्यमंत्री हिमंता विश्व सरमा यांच्या मते, राज्यात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या २९ झाली आहे.