महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

हरमीत देसाईने पटकावले इंडोनेशिया ओपनचे जेतेपद - indonesia open table tennis championship news

जागतिक क्रमवारीत दहाव्या क्रमांकावर असलेल्या राष्ट्रकुल चॅम्पियन हरमीतचे या वर्षातील हे दुसरे विजेतेपद आहे. हरमीतने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जपानच्या युटो किझिकोरीला ४-२ ने तर, उपांत्य सामन्यात हाँगकाँगच्या सियू हेंग लॅमला ४-२ ने हरवत अंतिम फेरी गाठली होती.

हरमीत देसाईने पटकावले इंडोनेशिया ओपनचे जेतेपद

By

Published : Nov 18, 2019, 10:51 AM IST

मुंबई -अनुभवी भारतीय टेबल टेनिसपटू हरमीत देसाईने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला शानदार फॉर्म कायम राखत इंडोनेशिया ओपन टेबल टेनिस स्पर्धेचे जेतेपद जिंकले. रविवारी झालेल्या या सामन्यात देसाईने पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत भारताच्याच अँथनी अमलराजचा ४-२ ने पराभव करीत सुवर्णपदक पटकावले.

हेही वाचा -'शमी हा जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज'

जागतिक क्रमवारीत दहाव्या क्रमांकावर असलेल्या राष्ट्रकुल चॅम्पियन हरमीतचे या वर्षातील हे दुसरे विजेतेपद आहे. हरमीतने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जपानच्या युटो किझिकोरीला ४-२ ने तर, उपांत्य सामन्यात हाँगकाँगच्या सियू हेंग लॅमचा ४-२ ने पराभव करीत अंतिम फेरी गाठली होती.

तर, उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अमरराजने पोर्तुगालच्या जोओ मॉन्टेरियाला ४-० आणि उपांत्य सामन्यात सेनेगलच्या इब्राहिम डियावचा पराभव करून अंतिम सामन्यात प्रवेश केला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details