नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अहमदाबाद येथे 2 फेब्रुवारी रोजी झालेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात स्टार फलंदाज शुभमन गिलने 126 धावांची नाबाद खेळी केली. एवढेच नाही तर गिलने त्याच्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतकही झळकावले. या सामन्यात गिलने वेगवान फलंदाजी करीत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. या विजयानंतर भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याने शुभमन गिलची मुलाखत घेतली. त्याचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला. ज्यामध्ये गिल त्याच्या कामगिरीबद्दल बोलताना दिसत आहे.
शुभमन गिलने आपल्या शानदार खेळीबद्दल केल्या दिलखुलास गप्पा :या सामन्यात शुभमन गिलने आपल्या शानदार खेळीबद्दल सांगितले की, त्याने काहीही वेगळे केले नाही. फक्त माझा नैसर्गिक खेळ खेळला. हार्दिक पांड्याच्या प्रश्नाला उत्तर देताना गिल म्हणाला की, 'जेव्हा तुम्ही सराव करता आणि निकाल मिळतो तेव्हा छान वाटते. संघासाठी चांगली खेळी केल्याचा खूप आनंद झाला आहे.
माझा नैसर्गिक खेळ खेळत राहिलो :षटकार मारण्याचे प्रत्येकाचे स्वतःचे तंत्र असते. हार्दिक पांड्याने मला माझा नैसर्गिक खेळ खेळायला सांगितले आणि मला वेगळे काही करण्याची गरज पडली नाही. मी खेळत राहिलो धावा होत राहिल्या. मी माझ्या नैसर्गिक फाॅर्ममध्ये खेळलो चांगल्या धावा होत गेल्या. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी करताना न्यूझीलंडचा डाव 168 धावांत गुंडाळला.
मैदानावर निर्णय घेताना तो त्याच्या मनाचे ऐकतो :मुलाखत घेताना हार्दिक पांड्याने शुभमन गिलला सांगितले की, मैदानावर निर्णय घेताना तो त्याच्या मनाचे ऐकतो. पुढे पंड्या म्हणाला की, 'मी नेहमीच अशा प्रकारे खेळ केला आहे. मी परिस्थिती समजून घेतो आणि काळाच्या गरजेनुसार निर्णय घेतो. त्याचवेळी पराभवामुळे निराश झालेल्या न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने चांगले क्रिकेट खेळल्याबद्दल भारतीय संघाचे कौतुक केले. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना झाला. भारताने हा सामना जिंकून मालिका 2-1 अशी खिशात घातली.