बडोदा -भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि कर्णधार विराट कोहली एकमेकांना दिलेले फिटनेस चॅलेंज पूर्ण करत आहेत. आता पुन्हा एकदा हार्दिकने अनोखे फिटनेस चॅलेंज दिले आहे. हार्दिक आणि कोहली हे दोघेही त्यांच्या फिटनेसमध्ये अव्वल मानले जातात.
हार्दिकचे विराटला नवे फिटनेस चॅलेंज... पाहा व्हिडिओ - Hardik pandya and virat kohli news
याआधी हार्दिकने 'फ्लाइंग पुशअप्स' चॅलेंज दिले होते. हे चॅलेंज विराटने पूर्ण केले. आता त्याने अधिक कठीण व्यायामाचे चॅलेंज आपल्या कर्णधारासमोर ठेवले आहे.
याआधी हार्दिकने 'फ्लाइंग पुशअप्स' चॅलेंज दिले होते. हे चॅलेंज विराटने पूर्ण केले. आता त्याने अधिक कठीण व्यायामाचे चॅलेंज आपल्या कर्णधारासमोर ठेवले आहे. हार्दिकने आता इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो वेगळ्या प्रकारे पुशअप्स मारत आहे. हार्दिकने विराट कोहलीशिवाय केएल राहुल आणि क्रुणाल पांड्या यांनाही हे चॅलेंज दिले आहे.
हार्दिकच्या या व्हिडिओमुळे त्याचे बरेच चाहते आनंदी झाले आहेत. कोरोनामुळे क्रिकेट उपक्रम सध्या बंद आहेत. तब्बल तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर इंग्लंड आणि विंडीज मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन होणार आहे. या दोन संघात 8 जुलैपासून तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार असून क्रिकेटप्रेमींना बऱ्याच दिवसानंतर घरी बसून क्रिकेटचा आनंद घेता येणार आहे.