नवी दिल्ली : डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजा आयपीएल 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या फलंदाजीच्या क्रमवारीत उंचावू शकतो, असा विश्वास भारताचा माजी ऑफस्पिनर हरभजन सिंग याने व्यक्त केला आहे. IPL 2022 मध्ये जडेजाने 10 डावांत 19.33 च्या सरासरीने केवळ 116 धावा केल्या आणि 7.52 च्या इकॉनॉमी रेटने फक्त पाच विकेट घेतल्या. शिवाय, गेल्या वर्षी स्पर्धेच्या सुरुवातीला तो सीएसकेचा कर्णधार होता. परंतु, एमएस धोनीने मध्यभागी नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारली आणि लवकरच, बरगडीच्या दुखापतीमुळे जडेजा उर्वरित स्पर्धेतून बाहेर पडला.
या खेळाडूबद्दल हरभजनसिंगला मोठी आशा :आयपीएल 2023 च्या आधी, जडेजाने ऑस्ट्रेलियावर भारताच्या 2-1 कसोटी मालिकेत विजय मिळवला तसेच मुंबईत संघाच्या एकदिवसीय विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. हरभजनने IPL 2023 चे अधिकृत टीव्ही प्रसारक स्टार स्पोर्ट्सला सांगितले की, एक खेळाडू ज्याच्यावर माझी नजर असेल तो म्हणजे रवींद्र जडेजा. सीएसकेसाठी तो कोणत्या प्रकारची फलंदाजी करणार आहे हे मला पाहायचे आहे.
आयपीएलमधील या खेळाडूला पाहण्यास उत्सुक :मला वाटते की त्याला क्रमवारीत (या हंगामात) ढकलले जाईल. तसेच चेंडूसह त्याची चार षटकेही महत्त्वपूर्ण ठरतील. सध्या जागतिक क्रिकेटवर नजर टाकली तर त्याच्यापेक्षा चांगला अष्टपैलू कोणी नाही. त्यामुळे रवींद्र जडेजा आयपीएलमध्ये परफॉर्म करताना पाहण्यासाठी मी उत्सुक आहे.