महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

लुईस हॅमिल्टन शुमाकरचा विक्रम नक्कीच मोडेल: सेरेना विल्यम्स - सेरेना विल्यम्स लुईस हॅमिल्टन स्तुती

मर्सिडीजचा चालक लुईस हॅमिल्टनने रशियन ग्रँड प्रिक्ससाठी ९६वी पोल पोझिशन मिळवली आहे. ही स्पर्धा जिंकल्यास तो ९१ रेस जिंकलेल्या मायकल शुमाकरच्या विक्रमाची बरोबरी करेल. त्यापूर्वी टेनिसपटू सेरेना विल्यम्सने लुईसची स्तुती केली आहे.

Lewis Hamilton and serena williams
लुईस हॅमिल्टन आणि सेरेना विल्यम्स

By

Published : Sep 27, 2020, 7:17 PM IST

हैदराबाद - फॉर्म्युला वन रेसर लुईस हॅमिल्टन लवकरच मायकल शुमाकरचा विक्रम मोडेल, अशा विश्वास दिग्गज टेनिसपटू सेरेना विल्यम्सने व्यक्त केला. हॅमिल्टन आताच्या पिढीतील सर्वोत्तम रेसर असल्याचेही सेरेना म्हणाली.

'लुईस हॅमिल्टन आणि मी एकमेकांच्या खूप जवळ आहोत. गेल्या कित्येक वर्षांपासून आम्ही एकमेकांना ओळखतो. मला त्याचे व्यक्तिमत्व खूप आवडते. त्याची मानसिकता कायम एका चॅम्पियनची आहे. तो जेव्हा सराव करत असतो त्यावेळी ती दिसून येते,' असे सेरेनाने म्हटले आहे. फॉर्म्युला वनच्या ट्विटर हँडलवर तिचा व्हिडिओ पोस्ट झाला आहे.

तो आताच्या पिढीतील सर्वोत्तम रेसर आहे. त्याने एखादी गोष्ट ठरवली की, ती तो पूर्ण केल्याशिवाय थांबत नाही. त्यामुळेच मला वाटते तो नक्कीच शुमाकरचा विक्रम मोडेल, असे सेरेना म्हणाली.

मर्सिडीजचा चालक लुईस हॅमिल्टनने रशियन ग्रँड प्रिक्ससाठी ९६वी पोल पोझिशन मिळवली आहे. ही स्पर्धा जिंकल्यास तो ९१ रेस जिंकलेल्या मायकल शुमाकरच्या विक्रमाची बरोबरी करेल. या महिन्याच्या सुरुवातीला हॅमिल्टनने टस्कन ग्रँड प्रिक्स जिंकून कारकिर्दीतील ९०वे विजेतेपद मिळवले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details