अबुधाबी -सातवेळा फॉर्म्युला वन विश्वविजेता लुईस हॅमिल्टन कोरोनामधून सावरला आहे. कोरोना चाचमी निगेटिव्ह आल्यानंतर तो आता पुढच्या शर्यतीसाठी सज्ज झाला आहे. आगामी अबुधाबी ग्रँड प्रिक्स येथे होणाऱ्या शर्यतीत हॅमिल्टन खेळणार आहे. मागील आठवड्यात झालेल्या साखिर ग्रँड प्रिक्स येथील शर्यतीत तो खेळला नव्हता. त्याच्या जागी ब्रिटनच्या जॉर्ड रसेलने शर्यतीत भाग घेतला. मात्र, तो शर्यत जिंकू शकला नाही.
कोरोनामधून सावरला लुईस हॅमिल्टन, 'या' शर्यतीत घेणार सहभाग - Abu Dhabi GP
बहारिनमध्ये १० दिवसांचा क्वारंटाइन कालावधी संपवून हॅमिल्टन सर्किटवर उतरला आहे. त्यामुळे रसेल आता विल्यम्स संघात परत जाईल, असे हॅमिल्टनचा संघ मर्सिडिझने सांगितले. बुधवारी हॅमिल्टनची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. त्यानंतर त्याने बहारिनमध्ये १० दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण केला.
हेही वाचा -विरूष्काच्या लग्नाला तीन वर्षे पूर्ण..विराटने केली खास पोस्ट
बहारिनमध्ये १० दिवसांचा क्वारंटाइन कालावधी संपवून हॅमिल्टन सर्किटवर उतरला आहे. त्यामुळे रसेल आता विल्यम्स संघात परत जाईल, असे हॅमिल्टनचा संघ मर्सिडिझने सांगितले. बुधवारी हॅमिल्टनची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. त्यानंतर त्याने बहारिनमध्ये १० दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण केला. गुरुवारी तो अबुधाबीला पोहोचला आहे. तिथेही त्याची चाचणी निगेटिव्ह आली. हॅमिल्टनने एफआयएने तयार केलेले प्रोटोकॉल पूर्ण केले आहे. पुढच्या आठवड्यात तो या शर्यतीत भाग घेईल"