जालना -डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादचा खेळाडू सुदर्शन खरात याने भुवनेश्वर येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय विद्यापीठ धनुर्विद्या स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली. सुदर्शनने इंडियन राऊंड प्रकारातील ५० मीटरमध्ये विद्यापीठाला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले.
सुदर्शन खरातला राष्ट्रीय विद्यापीठ धनुर्विद्या स्पर्धेत सुवर्णपदक हेही वाचा -भारताच्या कोनेरू हम्पीने पटकावले जागतिक रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद
सुदर्शनने ३२३ गुण मिळवत ही कामगिरी केली. सुदर्शनचा धनुर्विद्याचा प्रवास जालना जिल्ह्यातील जे. ई .एस. महाविद्यालयातून सुरू झाला. सुदर्शन हा सध्या परतूर येथील लाल बहादुर शास्त्री महाविद्यालयात बी. ए . तृतीय वर्षात शिकत आहे.
जे. ई .एस. महाविद्यालयाचे क्रीडा संचालक व धनुर्विद्या प्रशिक्षक डॉ. हेमंत वर्मा यांनी त्याला मार्गदर्शन केले. त्याच्या मार्गदर्शनाखाली सुदर्शनने शालेय राज्य फिल्ड अर्चरी, राज्य व विद्यापीठ स्तरावर निरंतर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. या संघासोबत प्रशिक्षक म्हणून डॉ. हेमंत वर्मा, आणि संघ व्यवस्थापक डॉ विश्वंभर तनपुरे काम पाहत आहेत. सुदर्शनच्या यशाबद्दल विद्यापीठाच्या क्रीडा संचालिका डॉ. कल्पना झरीकर, क्रीडा संचालक डॉ. बी .पी. नाईकनवरे, डॉ. नेताजी मूळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. मूळे, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती प्रमोदींनी अमृतवाड, डॉ. दिनकर टकले, प्रा. संभाजी तिडके यांनी अभिनंदन केले.