महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

खेलो इंडिया युथ गेम्स : नेमबाजीत महाराष्ट्राच्या रूद्राक्षला सुवर्णपदक - Khelo India Youth Games Rudraksha news

'या स्पर्धेत मला माझ्या प्रशिक्षकाने दिलेले मार्गदर्शन महत्वाचे ठरले. त्यांनी मला पदकाचा विचार करू नकोस, असे सांगितले होते. त्यामुळे मी गुणफलक न पाहता माझी कामगिरी सुरू ठेवली. अभिनव सरांनी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे, त्यामुळे देशासाठी 2 सुवर्णपदके जिंकण्याचे माझे स्वप्न आहे', असे रूद्राक्षने म्हटले.

Gold medal for Maharashtra's Rudraksha in shooting in Khelo India Youth Games
खेलो इंडिया युथ गेम्स : नेमबाजीत महाराष्ट्राच्या रूद्राक्षला सुवर्णपदक

By

Published : Jan 13, 2020, 8:14 PM IST

गुवाहाटी -येथे सुरू असलेल्या 'खेलो इंडिया युथ गेम्स'मध्ये महाराष्ट्राच्या रूद्राक्ष पाटील याने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. सोमवारी झालेल्या १० मीटर एयर रायफल प्रकारात त्याने सुवर्णपदक मिळवले आहे.

रूद्राक्ष पाटील

हेही वाचा -'कसोटी क्रिकेट म्हणजे चार दिवसाचं चादणं नव्हे', सेहवागनं दिलं आपलं मत

'या स्पर्धेत मला माझ्या प्रशिक्षकाने दिलेले मार्गदर्शन महत्वाचे ठरले. त्यांनी मला पदकाचा विचार करू नकोस असे सांगितले होते. त्यामुळे मी गुणफलक न पाहता माझी कामगिरी सुरू ठेवली. अभिनव सरांनी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे, त्यामुळे देशासाठी दोन सुवर्णपदके जिंकण्याचे माझे स्वप्न आहे', असे रूद्राक्षने म्हटले.

२१ वर्षाखालील मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या शाहू तुशार माने याने १० मीटर एयर रायफल प्रकारात कांस्यपदक पटकावले. त्यामुळे नेमबाजीत आता महाराष्ट्राच्या खात्यात 2 पदके आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details