महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

गोवा यंदा राष्ट्रीय खेळांचे आयोजन करणार नाही - सावंत - pramod sawant latest news

सावंत म्हणाले, "आम्ही खेळांचे आयोजन करण्यास 100 टक्के तयार आहोत. या खेळांचे आयोजन करताना आम्हाला अभिमान वाटला असता पण कोरोनामुळे या स्पर्धा पुढे ढकलाव्या लागत आहेत. गोवा ग्रीन झोन असून, देशभरातील लोक खेळांमध्ये भाग घेण्यासाठी इथे येतील."

goa cm pramod sawant talks about national games hosting in coronavirus pandemic
गोवा यंदा राष्ट्रीय खेळांचे आयोजन करणार नाही - सावंत

By

Published : May 29, 2020, 7:50 AM IST

पणजी -कोरोनाच्या उद्रेकामुळे यंदा गोवा राष्ट्रीय खेळांचे आयोजन करणार नाही, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले. सावंत पुढे म्हणाले, ''20 ऑक्टोबरपासून सुरू होणारे खेळ अनिश्चित काळासाठी तहकूब होतील. गोवा या खेळांसाठी अनिच्छुक असल्याचे भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनला (आयओए) सूचित करण्यात येईल.''

सावंत म्हणाले, "आम्ही खेळांचे आयोजन करण्यास 100 टक्के तयार आहोत. या खेळांचे आयोजन करताना आम्हाला अभिमान वाटला असता पण कोरोनामुळे या स्पर्धा पुढे ढकलाव्या लागत आहेत. गोवा ग्रीन झोन असून, देशभरातील लोक खेळांमध्ये भाग घेण्यासाठी इथे येतील."

राज्य सरकार नवीन तारखांवर विचार करेल का, असे विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले, ''कोरोनाच्या परिस्थितीमुळे नवीन तारखांबाबत आम्ही निर्णय घेऊ शकत नाही. हे खेळ बर्‍याच काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहेत. त्यामागील एक कारण म्हणजे गोव्यात आवश्यक पायाभूत सुविधा नसणे.''

ABOUT THE AUTHOR

...view details