महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

French Open 2022 : गॉफ पहिल्यांदाच ग्रँड स्लॅमच्या अंतिम फेरीत दाखल, विजेतेपदासाठी स्विटेकशी सामना - Sports News

कोको गॉफने दुसऱ्या उपांत्य फेरीत इटलीच्या मार्टिना ट्रेव्हिसनचा 6-3, 6-1असा पराभव करत शनिवारी अंतिम फेरीत ( Coco Goff Reach Final ) प्रवेश केला.

Coco Goff
Coco Goff

By

Published : Jun 3, 2022, 4:06 PM IST

Updated : Jun 3, 2022, 4:55 PM IST

पॅरिस:अमेरिकेची 18 वर्षीय स्टार खेळाडू कोको गॉफची ( American star player Coco Goff ) आता महिला एकेरीच्या अंतिम फेरीत पोलंडच्या जागतिक क्रमवारीत-1 इगा स्वितेकशी ( Iga Swiatek ) सामना होणार आहे. कोको गॉफने दुसऱ्या उपांत्य फेरीत इटलीच्या मार्टिना ट्रेव्हिसनचा 6-3, 6-1असा पराभव करत शनिवारी अंतिम फेरीत प्रवेश केला.

दुसरीकडे, जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या पोलंडच्या इगा स्विटेकनेही अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. या दोघांमधील विजेतेपदाचा सामना शनिवारी (४ जून) होणार आहे.

कोको गॉफबद्दल बोलायचे तर तिने ऑस्ट्रेलियन ओपन आणि विम्बल्डन ओपनची चौथी फेरी गाठली आहे. 2019 (विम्बल्डन) मध्ये प्रथमच तिने ग्रँड स्लॅमची चौथी फेरी गाठली होती. फ्रेंच ओपनमध्ये तिची तीन वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपुष्टात आली. अव्वल मानांकित स्वितेक दुस-यांदा फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे, तर 18वी मानांकित गॉफ तिच्या पहिल्या ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. स्वितेकने उपांत्य फेरीत 20व्या मानांकित कासात्किनावर 6-2, 6-1 असा विजय नोंदवत सलग 34 सामने जिंकले.

हेही वाचा -Issf World Cup : पुरुषांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये स्वप्नील कुसाळेने पटकावले रौप्यपदक

Last Updated : Jun 3, 2022, 4:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details