भोपाळ -मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे ७३ वी राष्ट्रीय जलतरण चॅम्पियनशीप स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी महाराष्ट्राच्या जलतरणपटूंनी चांगली कामगिरी केली. सकाळच्या सत्रात महिला आणि पुरुषांच्या गटात आठ इवेंट पार पडले. त्यामधून संध्याकाळी होणाऱ्या अंतिम फेरीसाठी जलतरणपटूंना निवडण्यात आले आहे.
हेही वाचा -टेनिसच्या महानायकाला भारताची भूरळ, म्हणतो..
पुरुष वर्गातील २०० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात महाराष्ट्राच्या आरोनची निवड झाली आहे. त्याचसोबत, एसएससीबीचा आनंद, दिल्लीचा कुशाग्र, कर्नाटकचा अविनाश, दिल्लीचा विशाल आसामचा ज्ञान संधान यांचीही निवड झाली आहे.
महिलांच्या १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक रेसप्रकारात महाराष्ट्राच्या शेरोन आणि करीनाने अंतिम फेरीत धडक दिली आहे. या व्यतिरिक्त गुजरातची कल्याणी, कर्नाटकची सलोनी, पंजाबची चाहत अरोरा मध्य प्रदेशची एनी जैन यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
महिला वर्गाच्या १०० मीटर बॅक स्ट्रोकच्या रिजर्व्ह गटात महाराष्ट्राच्या युगंधराने प्रवेश केला आहे. तर याच प्रकाराच्या पुरषांच्या रिजर्व्ह गटात महाराष्ट्राच्या जयने धडक दिली आहे. महिलांच्या २०० मीटर बटर फ्लाय रेसमध्ये महाराष्ट्राची अपेक्षा अंतिम फेरीत पोहोचली आहे.
महिलांच्याच १०० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात महाराष्ट्राच्या साध्वीने यश मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.