नवी दिल्ली -फॉर्म्युला वन चॅम्पियन लुईस हॅमिल्टन याने स्व:ताला एकांतवासात ठेवले आहे. कोरोना व्हायरस संक्रमित लोकांच्या संपर्कात आल्यामुळे त्याने हा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा -'धोनीला टी-२० विश्वकरंडकासाठी टीम इंडियात घेऊ नये'

हॅमिल्टन ४ मार्च रोजी लंडनमध्ये एका चॅरिटी कार्यक्रमात अभिनेता इदरीस एल्बा आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची पत्नी सोफी टुडू यांच्यासमवेत होता. हे दोघेही कोरोना व्हायरस चाचणीत 'पॉझिटिव्ह' आढळले आहेत. 'माझ्यावर अद्याप कोणत्याही लक्षणांचे निदान झालेले नाही, परंतु मी एकांतवासात राहतो आहे', असे हॅमिल्टनने सांगितले.
कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. आतापर्यंत कोरोनाची लागण होऊन १० हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर १५० हून अधिक देशांमध्ये कोरोनाचा फैलाव झाला आहे.