लंडन -फॉर्म्युला -१ चालक सर्जिओ पेरेझने रेड बुल संघाबरोबर वर्षभरासाठी करार केला आहे. मेक्सिकोचा पेरेझ आता पुढील हंगामात आपल्या नव्या संघासाठी स्पर्धा करेल. एका वृत्तानुसार, पेरेझ पुढच्या हंगामात मॅक्स व्हर्स्टापेनसह रेड बुलसाठी रेसिंग करताना दिसणार आहे.
फॉर्म्युला -१ : सर्जिओ पेरेझचा रेड बुल संघासोबत करार - सर्जिओ पेरेझ रेड बुल न्यूज
३० वर्षीय पेरेझने अलीकडेच बहरीनमधील साखिर ग्रँड प्रिक्स विजेतेपद जिंकले. आता तो रेड बुलमध्ये अलेक्झांडर अल्बॉनची जागा घेईल. रिझर्व्ह ड्रायव्हर म्हणून अल्बॉन रेड बुलबरोबर राहील.
![फॉर्म्युला -१ : सर्जिओ पेरेझचा रेड बुल संघासोबत करार Formula-1 driver Sergio Perez ties up with Red Bull](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9941947-thumbnail-3x2-dfdf.jpg)
फॉर्म्युला -१ : सर्जिओ पेरेझचा रेड बुल संघासोबत करार
हेही वाचा -बार्सिलोनासाठी ६४३ गोल!..मेस्सीची पेलेंच्या विक्रमाशी बरोबरी
३० वर्षीय पेरेझने अलीकडेच बहरीनमधील साखिर ग्रँड प्रिक्स विजेतेपद जिंकले. आता तो रेड बुलमध्ये अलेक्झांडर अल्बॉनची जागा घेईल. रिझर्व्ह ड्रायव्हर म्हणून अल्बॉन रेड बुलबरोबर राहील. जुलै महिन्यात सर्जिओ पेरेझला कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाची लागण झालेला पेरेझ हा पहिला फॉर्म्युला वन ड्रायव्हर आहे.