नवी दिल्ली:भारताची माजी महिला हॉकी कर्णधार एल्वेरा ब्रिटो ( Former women's hockey captain Elvera Brito ) हिने 60 च्या दशकात हॉकी विश्वात आपली क्षमता सिद्ध केली होती. मंगळवारी पहाटे बेंगळुरू येथे त्यांचे निधन ( Elvera Brito passes away ) झाले. एल्वेरा आणि तिच्या दोन बहिणी रिटा आणि माय महिला हॉकीमध्ये सक्रिय होत्या आणि 1960 ते 1967 दरम्यान कर्नाटककडून खेळल्या होत्या. त्यादरम्यान त्यांनी तीन बहिणींसह सात राष्ट्रीय विजेतेपद पटकावले होते.
एल्वेरा ( Elvera Brito ) यांना 1965 मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि त्या भारताकडून ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि जपानविरुद्ध खेळल्या होत्या. हॉकी इंडियाचे अध्यक्ष ज्ञानेंद्रो निंगोम्बम म्हणाले, "एल्वेरा ब्रिटोच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झाले.