पनामा सिटी -कोरोनाव्हायरसवर उपचार घेतल्यानंतर दिग्गज माजी बॉक्सर रॉबर्ट दुरान यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर दुरान यांना 25 जून रोजी पनामा शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
"देवाच्या कृपेने कोरोनासोबतच्या लढाईनंतर मी घरी परतलो. ही विश्वविजेतेपदाची लढत होती. तुमचे समर्थन, प्रेम आणि वैद्यकीय संघाच्या वचनबद्धतेमुळे मी ही लढाई जिंकू शकलो. वैद्यकीय पथकाने माझ्यासह सर्व रुग्णांची काळजी घेतली. प्रसिद्धी, पदवी, पुरस्कार, जात आणि धर्माबद्दल माहित नसलेल्या या रूग्णांनीही माझ्यासारखीच झुंज दिली", असे दुरान यांनी इन्स्टाग्रामवर सांगितले.