महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Former BCCI Official Neeraj Kumar revealed : तरुण महिला क्रिकेटपटूंना लैंगिक संबंधाची करतात मागणी; नीरज कुमार यांचा खळबळजनक दावा - Former BCCI Official Neeraj Kumar revealed

क्रिकेट जगतातील सर्वात श्रीमंत संघटना बीसीसीआय पुन्हा एकदा प्रश्नांच्या आणि वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. एका माजी अधिकाऱ्याने बीसीसीआयमधील भ्रष्टाचार तसेच शारीरिक संबंधांच्या मागणीबाबत मोठे खुलासा केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा क्रिकेटविश्वात खळबळ उडाली आहे. तसेच, यामुळे बीसीसीआयच्या विश्वासार्हतेवर निश्चितच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

Former BCCI Official Neeraj Kumar revealed
तरुण महिला क्रिकेटपटूंना लैंगिक संबंध ठेवण्याची करतात मागणी; नीरज कुमार यांचा खळबळजनक खुलासा

By

Published : Feb 20, 2023, 1:42 PM IST

नवी दिल्लीभारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) माजी अधिकाऱ्याने आपल्या पुस्तकात बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. बीसीसीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीयू) माजी प्रमुख नीरज कुमार यांनी बीसीसीआयला गोत्यात आणले आहे. नीरज कुमार यांनी त्यांच्या 'अ कॉप इन क्रिकेट' या पुस्तकात बीसीसीआयवर खुलासा करताना लिहिले की, येथे मॅच फिक्सिंगपेक्षाही जास्त भ्रष्टाचार आहे.

BCCI ACU अध्यक्ष नीरज कुमार यांचा खळबळजनक खुलासा :याशिवाय बीसीसीआयच्या एसीयूचे अध्यक्ष नीरज कुमार यांनी एक मोठा खुलासा केला की, क्रिकेटमध्येही तरुण महिला क्रिकेटपटूंना सेक्स करण्याची मागणी केली जाते. त्यांच्या कार्यकाळात अशा अनेक तक्रारी आल्या होत्या, असा त्यांचा दावा आहे. तीन वर्षे एसीयूचे प्रमुख असलेले नीरज म्हणाले की, लैंगिक शोषणाच्या तक्रारींवरून कोणावरही कारवाई झाली नाही.

आयपीएल, रणजीसाठी फसवणूक :आयपीएल आणि रणजीमध्ये जागा मिळवून देण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून लाखो रुपये घेतल्याच्या तक्रारी तरुण क्रिकेटपटू आणि त्यांच्या पालकांकडून मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. 1 जून 2015 ते 31 मे 2018 पर्यंत ACU चे प्रमुख असलेले नीरज म्हणाले की, त्यांनी या तक्रारी बीसीसीआय प्रशासकीय समितीचे तत्कालीन अध्यक्ष विनोद रॉय यांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. परंतु, यावर कोणतीही कारवाई झाली नाही. यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील वातावरण गढूळ झाले होते. या घणाघाती आरोपानंतर क्रिकेट विश्वात पुन्हा मोठी खळबळ माजली आहे.

नीरज कुमार यांच्या खुलाशाने वादळ :नीरज कुमार यांनी त्यांच्या 'अ कॉप इन क्रिकेट' या पुस्तकात हे खुलासे करून वादळ निर्माण केले आहे. त्यांचे म्हणणे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतले नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळी राहुल जोहरी बीसीसीआयचे सीईओ होते. नीरज कुमार यांनी राहुल जोहरी यांच्याशी संबंधित प्रकरणांची तक्रार विनोद राय यांच्याकडे केली होती. विनोद रॉय यांच्याशी जोहरीचे चांगले संबंध होते त्यामुळे प्रकरणे उडालेली होती.

चेतन शर्मांचे ताजे स्टींग :भारतीय संघाचे मुख्य निवडकर्ता आणि माजी वेगवान गोलंदाज चेतन शर्मा यांच्या स्टिंग ऑपरेशननंतर निश्चितच भारतीय क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या मोठ्या गौप्यस्फोटानंतर अनेक दिग्गज खेळाडूंचे भवितव्य धोक्यात येऊ शकते. तसेच, बीसीसीआयच्या कार्यशैलीवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहणार आहे. त्यामुळे बीसीसीआय चेतन शर्मांवर कारवाई करण्याची शक्यता असतानाच, चेतन शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

बीसीसीआयच्या विश्वसार्हतेवर प्रश्नचिन्ह :स्टिंग ऑपरेशनदरम्यान त्यांच्या मोठ्या गौप्यस्फोटामुळे चेतन शर्माचे राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्षपद नक्कीच धोक्यात आले आहे. परंतु, बीसीसीआय त्यांच्या कारकिर्दीचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी त्यांना स्वतःचा बचाव करण्याची संधी देऊ शकते. परंतु, हा एक तर्क असणार आहे. कारण त्यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे नक्कीच क्रिकेट विश्वात मोठा भूकंप होणार आहे. त्यामुळे पूर्ण जगात मान्यता असलेल्या बीसीसीआयच्या विश्वसार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे करणारा आहे. त्यामुळे चेतन शर्मा यांच्या 100 टक्के कारवाई होणार हे निर्विवाद आहे. या गोष्टी होण्याअगोदरच चेतन शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

हेही वाचा : IPL trophy winner : आयपीएलचा 16 हंगाम; मुंबई इंडियन्सने जिंकली पाच वेळा आयपीएल ट्रॉफी

ABOUT THE AUTHOR

...view details