अबू धाबी : विश्वचषकापूर्वी अर्जेंटिनाच्या अंतिम सराव सामन्यात ( FIFA World Cup Practice Match ) लिओनेल मेस्सी मैदानावर राहिला ( Lionel Messi Stayed on Field Throughout ) आणि त्याच्या संघाने युएईला ५-० ने पराभूत करताना ( Argentina Thrashed The UAE 5-0 ) एक गोल केला. यासह जेतेपदाच्या प्रबळ दावेदारांपैकी एक असलेल्या अर्जेंटिनाने आपला ( Argentina Beat UAE 5-0 ) अपराजित राहण्याचा सिलसिला ३६ सामन्यांपर्यंत वाढवला.
मध्यंतरापूर्वी मेस्सीने संघासाठी चौथा गोल केला. तत्पूर्वी, त्याने 17व्या मिनिटाला अर्जेंटिनाला आघाडी मिळवून देणाऱ्या ज्युलियन इव्हारेसच्या गोलमध्येही सहकार्य केले. संघाकडून एंजल डी मारियाने दोन, तर जोकुन कोरियाने एक गोल केला. मेस्सीने अर्जेंटिनासाठी गेल्या पाच सामन्यांमध्ये 10 गोल केले. त्याच्या आंतरराष्ट्रीय गोलांची संख्या 91 वर पोहोचली आहे.