दोहा : 22 व्या फिफा विश्वचषक 2022 मध्ये आज रात्री 8:30 वाजता ( India Defeated Ireland 2-1 ) क्रोएशिया आणि मोरोक्को ( Today Morocco Vs Croatia ) यांच्यात सामना होणार आहे. या विश्वचषकात दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमने-सामने येणार ( First Match Was 0-0 Draw ) आहेत. पहिला सामना ०-० असा बरोबरीत सुटला ( Both Teams Face to Face for Second Time ) होता. आजचा सामना जिंकून दोन्ही संघ विश्वचषकात तिसरे स्थान मिळवण्याचा प्रयत्न करतील. 2018 च्या उपविजेत्या क्रोएशियाला अंतिम फेरीत न पोहोचल्यामुळे या वेळी तिसरे स्थान मिळवण्याचा प्रयत्न करावा ( Third Place Between Morocco and Croatia ) लागणार आहे.
तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीमध्ये दोन्ही संघांना चमकदार कामगिरीची गरज :त्याचबरोबर विश्वचषकात चमकदार कामगिरी करणाऱ्या आफ्रिकन संघ मोरोक्कोलाही तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत कोणतीही कसर सोडायची नाही. दोन्ही संघांच्या खेळाडूंनी दमदार खेळ दाखवत आपापल्या संघांना विश्वचषकाच्या उपांत्य फेरीपर्यंत नेले. शेवटच्या चारमध्ये क्रोएशियाचा अर्जेंटिनाकडून 3-0 असा पराभव झाला. तर मोरोक्कोचा फ्रान्सकडून 0-2 असा पराभव झाला.