नवी दिल्ली : फिफा विश्वचषक 2022 (FIFA world cup 2022) मधील उपांत्यपूर्व फेरीचे सामने संपले आहेत. ब्राझील, इंग्लंड आणि पोर्तुगालसारखे दिग्गज संघ उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाले असून त्यांचा विश्वचषकातील प्रवास संपला आहे. गतविजेता फ्रान्स, दोन वेळचा विजेता अर्जेंटिना तसेच क्रोएशिया आणि मोरोक्को यांनी उपांत्य फेरी गाठली आहे. (FIFA world cup semi final).
पहिला उपांत्य सामना : पहिल्या उपांत्य फेरीत अर्जेंटिना आणि क्रोएशिया एकमेकांशी भिडणार आहेत. हा सामना 14 डिसेंबर रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 12.30 वाजता होणार आहे. गेल्यावेळेप्रमाणेच या वेळीही क्रोएशियाची नजर अंतिम फेरीत जाण्याकडे असेल, तर लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाचा संघ जेतेपदाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे.