दोहा : क्रोएशियाचे मुख्य प्रशिक्षक झ्लात्को डॅलिक (Croatia head coach Zlatko Dalic) यांनी शुक्रवारी ब्राझीलविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीपूर्वी ब्राझीलला या विश्वचषकातील सर्वात प्रबळ संघ म्हटले आहे. अंतिम 16 मध्ये क्रोएशियाने जपानला पेनल्टीवर हरवून अंतिम आठ फेरी गाठली आहे, तर ब्राझीलने दक्षिण कोरियाला 4-1 ने पराभूत केले होते. (Quarter Final Match Croatia vs Brazil) (FIFA World Cup 2022)
FIFA World Cup 2022 : ब्राझीलविरूद्ध क्रोएशियाला करावे लागेल आपले सर्वोत्तम प्रदर्शन - ब्राझील
डॅलिक यांच्या मते या विश्वचषकात ब्राझील हा सर्वोत्तम संघ आहे. ते सध्या वेगळ्या ब्रँडचा फुटबॉल खेळत आहेत. तो एक धोकादायक संघ आहेत. ब्राझीलचा संघ फक्त नेमार (Neymar) आणि विनिशियस ज्युनियरवर (Vinicius Junior) अवलंबून नाही. त्यांच्याकडे असे अनेक स्टार्स आहेत जे काही क्षणांत गेम पलटवू शकतात. (Brazil Football Team).
ब्राझीलचा संघ धोकदायक : डॅलिक यांच्या मते या विश्वचषकात ब्राझील हा सर्वोत्तम संघ आहे. ते सध्या वेगळ्या ब्रँडचा फुटबॉल खेळत आहेत. तो एक धोकादायक संघ आहेत. ब्राझीलचा संघ फक्त नेमार आणि विनिशियस ज्युनियरवर अवलंबून नाही. त्यांच्याकडे असे अनेक स्टार्स आहेत जे काही क्षणांत गेम पलटवू शकतात. क्रोएशियाचे मुख्य प्रशिक्षक झ्लात्को डालिक म्हणाले की, आमच्याविरुद्धच्या आम्ही ब्राझीलच्या मोठ्या स्टार खेळाडूंना जास्त संधी देऊ शकत नाही. आम्हाला त्यांच्यावर दबाव आणावा लागेल आणि त्यांनी चेंडूवर जास्त नियंत्रण ठेवू नये याची काळजी घ्यावी लागेल. आम्हाला पूर्ण एकाग्रतेने खेळावे लागेल. कारण विरोधी संघाला चेंडूवर ताबा ठेवण्यासाठी वेळ मिळाला तर आमच्यासाठी कठीण होऊ शकते.
आम्ही आमचा सर्वोत्तम खेळ दाखवण्याचा प्रयत्न करू : जपानविरुद्धच्या विजयाच्या चार दिवसांनंतर या सामन्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत, असे मुख्य प्रशिक्षक झ्लात्को डालिक यांनी सांगितले. जपानच्या सामन्यानंतर आम्हाला जास्त बदल न करता चांगला खेळ करण्यावर भर द्यावा लागेल. आतापर्यंत ब्राझील संघानेही चांगली कामगिरी केली आहे. आता आमचा सामना आणखी एका चांगल्या संघाशी होणार आहे. आम्ही आमचा सर्वोत्तम खेळ दाखवण्याचा प्रयत्न करू. 56 वर्षीय दालिक म्हणाले की, फिफा विश्वचषक 2022 मधील आगामी सर्व सामने आमच्यासाठी कठीण असतील. चार वर्षांपूर्वी फ्रान्सविरुद्धच्या अंतिम सामन्याशी या सामन्याची तुलना करता येऊ शकते. आमची महत्त्वाकांक्षा इथेच संपणार नाही. आम्ही जिंकण्याचा आणि पुढे जाण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करू.