महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

FIFA WC 2022: एमबाप्पेने केला नवा विक्रम! दिग्गज खेळाडूंना टाकले मागे - एमबाप्पेने दिग्गज खेळाडूंना टाकले मागे

किलियन एमबाप्पे हा सर्वात कमी सामन्यांमध्ये नऊ गोल करणारा खेळाडू ठरला आहे. या बाबतीत त्यांनी अनेक दिग्गजांना मागे टाकले आहे.

fifa world cup
एमबाप्पेने केला नवा विक्रम! दिग्गज खेळाडूंना टाकले मागे

By

Published : Dec 5, 2022, 10:16 PM IST

Updated : Dec 5, 2022, 10:57 PM IST

दोहा - फुटबॉल विश्वचषक 2022 च्या उपांत्यपूर्व फेरीत विद्यमान विश्वविजेत्या फ्रान्सने रविवारी पोलंडचा 3-1 असा पराभव केला. फ्रान्सकडून या सामन्यात युवा स्टार किलियन एमबाप्पेने दोन गोल केले. अनुभवी ऑलिव्हियर गिरौडने गोल केला. यादरम्यान एमबाप्पेने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. एमबाप्पे सर्वात कमी सामन्यांमध्ये नऊ गोल करणारा खेळाडू ठरला आहे. या बाबतीत त्याने अनेक दिग्गजांना मागे सोडले आहे. वयाच्या 24 व्या वर्षी किलियन एमबाप्पेने फुटबॉल विश्वचषकात केवळ 11 वा सामना खेळताना 9वा गोल केला.

एमबाप्पेचे आता विश्वचषकातील केवळ 11 सामन्यांत एकूण 9 गोल झाले आहेत. त्याचवेळी, क्रिस्टियानो रोनाल्डोचे विश्वचषकातील 20 सामन्यांमध्ये एकूण 8 गोल आहेत. तर दिएगो मॅराडोनाचे २१ सामन्यांत ८ गोल आहेत. विश्वचषक स्पर्धेत अर्जेंटिनासाठी 23 सामन्यांत मेस्सीचे एकूण 9 गोल आहेत. एमबाप्पेने या विश्वचषकात आतापर्यंत 5 गोल केले आहेत. गेल्या फिफा विश्वचषकातही कायलियन एमबाप्पेने चार गोल केले होते. एमबाप्पेच्या एकूण विक्रमाबद्दल बोलायचे तर फ्रान्सकडून खेळताना त्याने गेल्या 14 सामन्यांत 16 गोल केले आहेत.

रोनाल्डोने फिफा विश्वचषक स्पर्धेत एकूण २० सामने खेळले असून त्यात आठ गोल केले आहेत. त्याचबरोबर एमबाप्पेने फिफा विश्वचषक स्पर्धेत केवळ ११ सामन्यांत नऊ गोल केले आहेत. मेस्सीने २३ सामन्यांत नऊ गोल केले आहेत. २३ वर्षीय एमबाप्पेने यापूर्वीच अनेक दिग्गजांना मागे सोडले आहे. तो या विश्वचषकात सर्वाधिक गोल करणारा खेळाडू आहे आणि त्याने पेलेचा ६० वर्ष जुना विक्रमही मोडला आहे. वयाच्या २४व्या वर्षी तो फिफामध्ये सर्वाधिक गोल करणारा खेळाडू बनला आहे. यासोबतच त्याने मॅराडोना आणि पेलेसारख्या दिग्गजांनाही मागे टाकले आहे.

Last Updated : Dec 5, 2022, 10:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details