नवी दिल्ली :फिफा विश्वचषक 2022 (FIFA World Cup 2022) चा उत्साह शिगेला पोहोचला आहे. 20 नोव्हेंबरपासून कतारमध्ये या स्पर्धेला सुरुवात झाली, तर विजेतेपदाचा सामना 18 डिसेंबरला होणार आहे. कतारमध्ये खेळल्या जाणाऱ्या FIFA विश्वचषक 2022 मध्ये गट-स्टेज सामने संपले आहेत. फिफा विश्वचषकाच्या बाद फेरीला आजपासून सुरुवात होत आहे. (FIFA World Cup 2022 knockout matches schedule)
प्री-क्वार्टर फायनलसाठी पात्र ठरलेला फ्रान्स हा पहिला संघ ठरला. त्यानंतर ब्राझील, पोर्तुगाल आणि अर्जेंटिना या संघांनीही फ्रान्सच्या पावलावर पाऊल टाकत सुपर-16 फेरीत स्थान मिळवले. मात्र चार वेळचा चॅम्पियन जर्मनी आणि वर्ल्ड नंबर 2 बेल्जियम या संघांना सुपर-16 मध्ये स्थान मिळवता आले नाही.
या 16 संघांनी प्री-क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे :
1. फ्रान्स
2. ब्राझील
3. पोर्तुगाल
4. नेदरलँड
5. सेनेगल
6. यूएसए
7. इंग्लंड
8. अर्जेंटिना
9. पोलंड
10. स्वित्झर्लंड
11. क्रोएशिया