अल खोर (कतार) : फ्रान्स विरुद्धचा उपांत्यपूर्व सामन्यात हॅरी केनने (harry kane) पहिल्या पेनल्टीचे गोलमध्ये रुपांतर केल्यानंतर त्याची दुसरी पेनल्टी हुकली. (harry kane penalty miss). त्यामुळे इंग्लंडच्या विश्वचषक जिंकण्याच्या आशा धुळीस मिळाल्या. मात्र आता त्याचे संघातील सहकारी या स्टार स्ट्रायकरच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. (support of harry kane after penalty miss).
FIFA World Cup 2022 : पेनल्टी मिसनंतर इंग्लंडचे खेळाडू आणि प्रशिक्षक हॅरी केनच्या समर्थनार्थ पुढे आले - फ्रान्स
फिफा विश्वचषक 2022 (FIFA World Cup 2022) मध्ये शनिवारी उशिरा झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात फ्रान्सने इंग्लंडचा 2-1 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. (england vs france).
बरोबरी करण्याची संधी गमावली : उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात फ्रान्स २-१ ने आघाडीवर असताना, खेळाच्या ८४व्या मिनिटाला इंग्लंडला पेनल्टी मिळाली. पेनल्टीच्या रुपाने इंग्लंडला सामन्यात बरोबरी साधण्याची संधी होती. मात्र पेनल्टीवर मारलेला केनचा फटका क्रॉसबारवर गेला आणि यासह उपांत्य फेरी गाठण्याच्या इंग्लंडच्या आशाही संपुष्टात आल्या. फ्रान्सचा स्टार स्ट्रायकर किलियन एम्बापेने केनचा शॉट चुकताच आनंद साजरा केला. तर इंग्लंडचे खेळाडू आणि समर्थकांच्या चेहऱ्यावर निराशा पसरली. स्वत: केन देखील या शॉटनंतर हैराण झालेला दिसला. त्याने शर्टाने आपला चेहरा झाकून घेतला.
केन जागतिक दर्जाचा स्ट्रायकर : सामन्यानंतर इंग्लंडच्या खेळाडूंनी केनला पाठिंबा दिला. इंग्लंडचा मिडफिल्डर जॉर्डन हेंडरसन म्हणाला, "हॅरीने पेनल्टीवर आमच्यासाठी किती गोल केले हे आम्हाला माहीत आहे. त्याने केलेल्या गोलमुळेच संघ इथपर्यंत पोहोचला आहे. या सामन्यातील पहिल्या पेनल्टीचेही त्याने गोलमध्ये रुपांतर केले होते. आम्हाला इथपर्यंत पोहोचवण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तो एक जागतिक दर्जाचा स्ट्रायकर व आमचा कर्णधार आहे. तो नसता तर आम्ही इथपर्यंत पोहोचूच शकलो नसतो". केनने चालू विश्वचषकात पाच सामन्यांत दोन गोल केले आहेत. फ्रान्सविरुद्धचा गोल हा त्याचा इंग्लंडसाठी 53वा गोल होता. या गोलद्वारे त्याने वेन रुनीच्या राष्ट्रीय विक्रमाशी बरोबरी केली आहे. इंग्लंडचे प्रशिक्षक गॅरेथ साउथगेट म्हणाले की, "त्याने आमच्यासाठी अविश्वसनीय कामगिरी केली आहे. या पेनल्टी परिस्थितीत तो आमचा सर्वात विश्वासार्ह खेळाडू आहे. त्याने केलेल्या गोलांच्या संख्येशिवाय आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो नसतो.