नवी दिल्लीभारतीय फुटबॉल खेळाडू आणि चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ असोसिएशन फुटबॉल FIFA ने अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनला All India Football Federation तत्काळ प्रभावाने निलंबित केले FIFA Suspends AIFF आहे. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे फिफाने म्हटले India Football Suspension आहे. तृतीय पक्षांच्या हस्तक्षेपामुळे फिफाने हा निर्णय घेतला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे 16 ऑगस्टपासून कोलकातामध्ये ड्युरंड चषक स्पर्धा सुरू होत आहे. यामध्ये बंगळुरू एफसीचा संघ जमशेदपूर एफसीशी भिडणार आहे.
ऑगस्टच्या सुरुवातीस फिफाने तृतीय पक्षाच्या हस्तक्षेपाबद्दल एआयएफएफला निलंबनाचा इशारा दिला होता. मात्र आता सर्वांच्या सहमतीनंतर निलंबनाचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी निवेदनात सांगितले. FIFA ने सांगितले की FIFA परिषदेच्या ब्युरोने एकमताने अखिल भारतीय फुटबॉल महासंघ AIFF ला तृतीय पक्षांच्या अवाजवी प्रभावासाठी तात्काळ निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. जे FIFA च्या नियमांचे गंभीर उल्लंघन आहे.