दुबई - फाजा जागतिक पॅरा तिरंदाजी चॅम्पियन स्पर्धेत भारतीय तिरंदाजांनी पाच पदकं जिंकली. यात दोन सुवर्ण तर ३ रौप्य पदकांचा समावेश आहे. तिरंदाजांच्या या कामगिरीमुळे भारत या स्पर्धेत तिसऱ्या स्थानी राहिला.
पुरूष गटात राकेश आणि स्वामी यांच्यातील सामना राकेशने जिंकला. तर महिला गटात ज्योती बलियान हिने रौप्य पदकाची कमाई केली.
गुरूवारी भारताचा तिरंदाज हरविंदर सिंह आणि पूजा या दोघांनी मिश्रमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.