डेहराडून:थायलंडमध्ये पहिल्यांदाच जागतिक प्रतिष्ठेची थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धा भारतीय बॅडमिंटन संघाने जिंकली. तेव्हा संपूर्ण देश आनंदात होता. क्रीडाप्रेमी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांनी लगेच थायलंडला फोन केला. थॉमस चषक विजेत्या संघाच्या प्रत्येक खेळाडूशी त्यांनी फोनवरुन संवाद साधला. त्यावेळी लक्ष्य सेनला बाल मिठाई घेऊन येण्यास सांगितले होते.
पीएम मोदींनी बाल मिठाईसाठी केली होती विनंती: जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तराखंड, अल्मोडा येथील लक्ष्य सेन याच्याशी बोलले, तेव्हा त्यांनी त्याला बाल मिठाई खाऊ घालण्यास सांगितले. लक्ष्य सेनने थॉमस कप बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतासाठी पहिला सामना जिंकला होता. लक्ष्यने पीएम मोदींची ही विनंती पूर्ण करण्याचा निर्धार केला होता. लक्ष्यने वडिलाना मनातली गोष्ट सांगितली. पीएम मोदींची इच्छा पूर्ण होईल, असेही त्याचे वडील डीके सेन म्हणाले.
रविवारी पंतप्रधान मोदींनी थॉमस चषक विजेत्या संघाला आमंत्रित केले: थॉमस चषक जिंकून संघ भारतात परतला, तेव्हा खेळाडूंना शनिवारी कळले की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना रविवारी भेटायला बोलावले आहे. बैठकीला काही तास उरले होते. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदींना मिठाई भेट देण्याचे आश्वासन पूर्ण करण्याचे आव्हान लक्ष्यासमोर उभे राहिले होते.
लक्ष्यच्या वडिलांनी अल्मोडा येथून बाल मिठाई मागवली: लक्ष्यचे वडील आणि प्रशिक्षक डीके सेन यांनी शनिवारी संध्याकाळी उशिरा अल्मोडा येथे त्यांचे मित्र आणि उत्तराखंड बॅडमिंटन सचिव बीएस मनकोटी यांना बोलावले. डीके सेन यांनी मनकोटीला सांगितले की अल्मोडाहून मिठाई पाठवणे किती महत्त्वाचे आहे. बीएस मनकोटी यांनी लक्ष्य सेनचे वडील डीके सेन यांना रविवारी थॉमस कप विजेत्या संघासोबत पंतप्रधानांच्या भेटीपूर्वी लक्ष्यसोबत मिठाई पाठवण्याचे वचन दिले.