हैदराबाद - पॅराऑलंपिकपटू सुयश जाधवने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कर्तृत्वाची छाप सोडली आहे. वयाच्या १३ व्या वर्षी एका अपघातात आपले दोन्ही हात गमावणाऱ्या सुयशने जिद्द सोडली नाही. दोन्ही हात अपघातात गमावूनही त्याने पोहण्याचा सराव केला. २०१८ साली आशियायी अपंगाच्या जलतरण स्पर्धेत त्याने सुवर्णपदक मिळविले. तर २०१६ साली झालेल्या जर्मनीतील स्पर्धेत त्याने दोन कांस्य आणि एक रौप्य पदक मिळवले. त्याचा हा प्रवास सर्वांना प्ररणा देणारा आहे. ईटीव्ही भारतने सुशय जाधवची खास मुलाखत घेतली आहे. त्याचा हा वृत्तांत...
प्रश्न: एशियन पॅरा स्पर्धांमध्ये पहिलेवहिले सुवर्ण पदक जिंकण्यानंतर काय भावना होती ?
उत्तर - हे माझे पहिले आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुवर्ण पदक होते. तसेच आशियायी अपंग स्पर्धांमधील भारताच्या इतिहासातील पहिले सुवर्ण पदक होते. भारतासाठी आणि माझ्यासाठीही हा मोठा आनंदाचा क्षण होता. या यशाने मला भारतीय असल्याचा अभिमान वाटला. हा खरचं एक उत्तम अनुभव होता.
प्रश्न: अंपगत्व आल्याच्या कटू अनुभवाबद्दल सांगा, या अपघातानंतर तणावाचा सामना केला का?
उत्तर - माझा अपघात घडला तेव्हा मी सहावीला होतो, आणि ते २००४ साल होते. मी आणि माझे कुटुंबिय माझ्या चुलत भावाच्या लग्न समारंभाला गेलो होतो. हॉलच्या छतावर जेथे लग्न होणार होते, तेथे मी खेळत होतो. त्यावेळी मी विजप्रवाह सुरु असलेल्या एका उघड्या तारेला हात लावला. त्यानंतर माझे दोन्ही हात अपंग झाले. त्यामुळे डॉक्टरांनी माझे दोन्ही हात कोपरापासून कापून काढण्याचा निर्णय घेतला.
ज्या वेळी ही घटना घडली तेव्हा मी खूप लहान होतो. माझ्यासोबत काय घडले याची देखील मला जाणीव नव्हती. त्यामुळे मी तणावात नव्हतो, माझे कुटुंबिय तणावात होते. दोन्ही हात गमावल्याने मी नाराज होतो. मात्र, तणावात नव्हतो. या कठीण प्रसंगातून बाहेर येण्यासाठी मी कोणचेही विशेष सहकार्य घेतले नाही. हळूहळू मी स्वावलंबी बनत गेलो. माझ्या स्वत:च्या प्रयत्नाने दैनिंदिन कामे करु लागलो. त्यानंतर एकेदिवश मी पूर्णपणे स्वावलंबी झालो.
प्रश्न - तुमच्या प्रवासात वडिलांनी मोठी मदत केल्याचे तुम्ही सांगता. वडीलच पहिले प्रशिक्षक होते. राष्ट्रीय जलतरणपटू असलेल्या तुमच्या वडिलांबद्दल सांगा
उत्तर - १९७८ साली राष्ट्रीय स्तरावरील जलतरण स्पर्धेसाठी माझ्या वडीलांची निवड झाली होती. मात्र, काही अडचणींमुळे ही स्पर्धा रद्द झाली. भारतासाठी सुवर्ण पदक घेण्याचे त्यांचे स्वप्न भंग झाले. मात्र, त्यांचे स्वप्न मी पूर्ण करावे, अशी त्यांची इच्छा होती. माझे वडील माझे पहिले प्रशिक्षक होते. त्यांनी मला पोहण्याचे प्राथमिक धडे दिले.
प्रश्न - तुमच्या फिजिकल फिटनेसची दिनचर्या सांगा. इतर जलतरणपटूपेक्षा ते कसे वेगळे आहे.
उत्तर - मी धावण्याच सराव करतो. बॉक्सिंगचे ग्लोव्ज घालून मी जोर(पुशअप्स) मारतो. तसेच इतर व्यायामही करतो. मी व्यायामात काही बदल केले असून त्यानुसार व्यायाम करतो. शरिराच्या वरच्या भागाचा पुरेसा व्यायाम करुन मी खालच्या भागावर लक्ष्य केंद्रित करतो.
पोहण्याआधी आणि नंतर जो ठरलेला व्यायाम आहे, तो मी दैनंदिन करतो. या शिवाय बुधवार आणि शनिवार शारीरिक तंदुरुस्तीसाठी राखीव ठेवला आहे.