नवी दिल्ली - भारताची माजी धावपटू पी.टी. उषाला एक मोठा सन्मान मिळाला आहे. पी.टी. उषाची एशियाई एथलेटिक्स संघाच्या (एएए) सदस्यपदी निवड झाली आहे. सहा सदस्यांच्या बैठकीत आता पी.टी उषाला स्थान मिळाले आहे.
१९९२ च्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये हातोडा फेक या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक जिंकलेले आंद्रे अबदुवलीयेव हे या संघाचे प्रमुख असतील. आंद्रे अबदुवलीयेव हे उझबेकिस्तान देशाचे आहेत. पी.टी. उषाने आपले नियुक्तीचे पत्र आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केले आहे. 'मी तुमची आभारी आहे. एएएची सदस्य होणे हा अविश्वसनीय सन्मान आहे', असे तिने ट्विटमध्ये म्हटले आहे.