महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

women hockey team : ऑलिम्पिकमधील परफॉर्मन्स आगामी खेळांत मदत करेल - कर्णधार राणी रामपाल

हॉकी संघाचे ऑलिम्पिकमधील अनुभव कसे होते? उपांत्यफेरीसाठी पात्र ठरल्यानंतर खेळाडूंची प्रतिक्रिया काय होती? याबाबत ईटीव्ही भारतने भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल हिच्याशी बातचित केली.

interview Rani Rampal etv bharat
भारतीय महिला हॉकी संघ मुलाखत

By

Published : Aug 11, 2021, 3:21 AM IST

नवी दिल्ली - टोकियो ऑलिम्पिकमध्ये यंदा भारतीय महिला हॉकी संघाने उत्कृष्ट खेळ खेळत इतिहास रचला. संघाने आपल्या खेळातून भारतीयांची मने जिंकली. महिला संघाने उपांत्यफेरीच्या सामन्यात धडक मारली होती, जे इतिहासात पहिल्यांदाच झाले होते. आता संघ मायदेशी परतला आहे. हॉकी संघाचे ऑलिम्पिकमधील अनुभव कसे होते? उपांत्यफेरीसाठी पात्र ठरल्यानंतर खेळाडूंची प्रतिक्रिया काय होती? याबाबत ईटीव्ही भारतने भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल हिच्याशी बातचित केली.

भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार, प्रशिक्षक आणि खेळाडू यांच्याशी बातचित करताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

हेही वाचा -नीरज चोप्रा प्रशिक्षक वाद : नाईक यांनी केलं एएफआय प्रमुख सुमरिवाला यांच्या वक्तव्याचं खंडन

एवढ्या उत्कृष्ट खेळाची कोणालाही अपेक्षा नव्हती

ऑलिम्पिकमध्ये उपांत्यफेरीत धडक मारत इतिहास घडवल्यानंतर महिला हॉकी संघावर कौतुकांचा वर्षाव झाला. सोशल मीडियावर संघाचे अभिनंदन होत होते. काही लोकं तर महिला हॉकी संघाची तुलना 'चक दे इंडिया' या चित्रपटातील महिला हॉकी संघाशी देखील करत होते. संघाची कर्णधार राणी रामपाल हिने सांगितले की, या वर्षीचा ऑलिम्पिक भारतीय संघासाठी खूप चांगला राहिला. स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाकडून एवढ्या उत्कृष्ट खेळाची कोणालाही अपेक्षा नव्हती. मात्र, संघाला पूर्ण विश्वास होता आणि युरोपियन संघाशी सामना झाल्यानंतर संघाचा फक्त उत्साहच नव्हे, तर त्याच्या कामगिरीमध्येही सुधारणा झाली. परंतु, पदक जिंकण्यात यश न आल्याने थोडे निराश आहोत, पण आमचा उत्साह टिकून आहे.

...यामुळे, आम्ही उपांत्य फेरी गाठू शकलो

कर्णधार राणी रामपाल पुढे म्हणाली की, टोकियो ऑलिम्पिकदरम्यान सर्व खेळाडूंमध्ये चांगली फील होती. यामुळे, आम्ही उपांत्य फेरी गाठू शकलो, परंतु पदक जिंकू शकलो नाही. मात्र, यावर्षी ऑलिम्पिकमधील कामगिरीमुळे केवळ संपूर्ण संघाचा आत्मविश्वासच वाढणार नव्हे, तर आगामी स्पर्धांच्या कामगिरीमध्ये देखील सुधार दिसून येईल.

सर्वोत्तम संघांसोबत सामने खेळून संघाचा आत्मविश्वास शिखरावर

भारतीय महिला हॉकी संघाने आपल्या कामगिरीतून देशभरातील महिलांना प्रेरित केले आहे. युरोपियन देशांचा महिला हॉकी संघ हा भारतीय महिला हॉकी संघापेक्षा अधिक मजबूत आहे. मात्र, जेव्हापासून संघाशी दक्षिण आफ्रिकन कोच जुळले आहेत, तेव्हापासून संघाच्या फिटनेसमध्ये खूप प्रगती झाली आहे. ऑलिम्पिकमध्ये जगातील सर्वोत्तम संघांसोबत सामने खेळून संघाचा आत्मविश्वास शिखरावर आहे. याचा परिणाम आगामी स्पर्धेत जागतिक दर्जाच्या संघांविरुद्धच्या सामन्यांमध्येही दिसेल. टीम इंडिया जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करेल, असा विश्वास राणी रामपाल हिने व्यक्त केला.

'हे' ऑलिम्पिकनंतर कळले

कोणत्या संघाचा काय खेळ आहे आणि विरोधी संघांना कसे सामोरे जावे, हे ऑलिम्पिकनंतर माहिती झाले. येत्या चार वर्षांत भारतीय हॉकी संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र होण्यासाठी आणि पदक जिंकून आणण्यासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल, अशी राणी म्हणाली.

राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलण्यावर राणी म्हणाली...

राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून त्यास मेजर ध्यानचंद खेल पुरस्कार असे ठेवण्यात आले आहे. त्यावर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खूप चांगला निर्णय घेतला आहे. मी हॉकी खेळाडू आहे आणि हॉकीचे जादूगर समजल्या जाणाऱ्या मेजर ध्यानचंद यांच्या नावावर खेलरत्न पुरस्काराचे नाव ठेवण्यात आले आहे. ही अभिमानाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया कर्णधार राणी हिने दिली.

भारतीय महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक म्हणाले...

भारतीय महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक शॉर्ड मारिन यांनी सांगितले की, भारतीय महिला हॉकी संघ खेळात सुधार करून विरोधकांना आश्चर्यचकित करेल आणि उपांत्यफेरी गाठेल, अशी कोणानेही अपेक्षा केली नव्हती. भारतीय महिला हॉकी संघ संपूर्ण स्पर्धेत डार्क हॉर्ससारखा खेळला. जे स्तुत्य आहे. गेल्या काही वर्षांत संघाने कामगिरीत प्रचंड सुधारणा केली आहे. खेळाडूंमध्ये आत्मविश्वासही प्रचंड वाढला आहे.

शॉर्ड मारिन म्हणाले की, जेव्हा तुमच्यापासून कोणालाही अपेक्ष नसते तेव्हा खेळादरम्यान तुमच्यावर परफॉर्म करण्यासाठी दबाव देखील कमी असतो. यामुळे, खेळाडू चांगले परफॉर्म करू शकतात. जगात होणाऱ्या सर्व प्रकारच्या क्रिडा स्पर्धांमध्ये ऑलिम्पिक हा सगळ्यात कठीण आहे. जगभरातील खेळाडू आणि संघ यात सहभागी होतात. यासाठी माईंड सेट संपूर्णपणे आधीच तायार करून ठेवले होते.

महिला खेळाडू म्हणाल्या....

भारतीय हॉकी संघाच्या महिला सदस्य म्हणाल्या की, टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाग घेतल्यानंतर खूपकाही शिकायला मिळाले. यातील अनुभव आगामी मोठ्या स्पर्धांमध्ये उपयोगी पडेल. न केवळ जागतिक दर्जाच्या संघांसोबत होणाऱ्या सामन्यांदरम्यान मदत मिळणार, तर त्यांचा कमकुवतपणा देखील भारतीय संघाला कळेल.

महिला खेळाडू म्हणाल्या की, उपांत्यफेरीचा सामना कठीण संघासोबत होता. त्यात सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडल्या नाहीत. तसेच, कांस्य पदकासाठी झालेल्या सामन्यात देखील मिळालेल्या संधींचा फायदा घेता आला नाही. हा एक खेळाचा भाग आहे. भारतीय संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी केवळ पात्र होण्यासाठीच नव्हे, तर सर्वोत्तम कामगिरी सुरू ठेवत पदक मिळवण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करेल.

हेही वाचा -कुस्ती महासंघाने विनेश फोगाटचं केलं निलंबन, जाणून घ्या काय आहे प्रकरण

ABOUT THE AUTHOR

...view details