केपटाऊन : आयसीसी महिला विश्वचषक 2023 मध्ये इंग्लंडने मंगळवारी त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात पाकिस्तानवर ११४ धावांनी दणदणीत विजय मिळवला. आयसीसी महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेतील गट दोनमधील आपले अव्वल स्थान कायम राखले. इंग्लंडचा हा विजय म्हणजे ब गटात दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या भारतीय संघाला उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाच्या बलाढ्य संघाचे आव्हान पेलावे लागणार आहे. गट 'ब'मध्ये इंग्लंडने चारपैकी चार सामने जिंकू आठ गुण प्राप्त केले आहेत. उपांत्य फेरीत त्यांची लढत गट 'अ' मधील दुसऱ्या स्थानावरील संघाशी होईल.
इंग्लडने सामना जिंकल्यानंतर होणारी स्थिती :भारताने चारपैकी तीन सामने जिंकले आणि गट 'ब'मध्ये सहा गुणांसह दुसरे स्थान पटकावले. उपांत्य फेरीत गुरुवारी त्यांचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. ज्यांनी गट 'अ' मधील चारही सामने जिंकले आणि आठ गुणांसह पहिले स्थान मिळवले. इंग्लंडने पाकिस्तानविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पाच गडी गमावून 213 धावा केल्या. महिला टी-20 विश्वचषकात एखाद्या संघाने 200 धावांचा टप्पा ओलांडण्याची ही पहिलीच वेळ आहे.
इंग्लडची फलंदाजी : इंग्लडच्या फलंदाजांनी जोरदार बॅटींग करीत निर्धारित 20 षटकांत 5 विकेट गमावून 213 धावा केल्या होत्या. त्यांनी विजयासाठी पाकिस्तानला 214 धावांचे लक्ष्य दिले होते. सलामीवर डुनक्ले अवघ्या 2 धावांवर लवकरच बाद झाली. त्यानंतर आलेली अलीस कॅप्सेसुद्धा 6 धावा करून मैदानाबाहेर आली. त्यानंतर आलेल्या नॅट स्किव्हर ब्रुंटने शानदार फलंदाजी करीत 40 चेंडूत शानदार 81 धावांची नाबाद खेळी केली. त्याचबरोबर डी वॅटने 33 चेंडूत 59 धावांची फटकेबाजी करीत संघाच्या धावसंख्येला विशेष आकार दिला.