लंडन - बीसीसीआयने बंगळुरूमधील नॅशनल क्रिकेट अकादमीच्या प्रमुख पदासाठी अर्ज मागवले आहेत. यामुळे अशी आशा केली जात आहे की, सद्याचे प्रमुख राहुल द्रविड यांना भविष्यात सीनियर संघाची जबाबदारी देण्यात येऊ शकते. याशिवाय टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री टी-20 विश्व करंडक स्पर्धेनंतर प्रशिक्षणाठी उत्सुक नसल्याचे देखील वृत्त आहे. पण सूत्रांच्या मते, याविषयी सद्याच्या घडीला बोलणे थोडेसे घाईचे ठरेल.
एएनआयशी बोलताना बीसीसीआयमधील सूत्रांनी सांगितलं की, इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्स स्टेडियममध्ये खेळवण्यात येणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान, बीसीसीआयचे अधिकारी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि खेळाडूंशी चर्चा करणार आहे. या दरम्यान, जर संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री त्याचा कारभार पुढे कायम ठेवण्यात इच्छुक नसतील तर पुढील रणणितीवर चर्चा केली जाणार आहे.
बीसीसीआयमधील सूत्रांच्या मते, यामुद्यावर बोलणे थोडेसे घाईचे ठरेल. आज बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, उपाध्यक्ष, सचिव जय शाह हे लंडनला पोहोचणार आहे. सर्व अधिकारी लॉर्ड्स कसोटी दरम्यान प्रशिक्षक रवी शास्त्री आणि टीम इंडियाची भेट घेत पुढील रणणितीवर चर्चा करणार आहेत. जर रवी शास्त्री आपल्या पदावर कायम राहण्यास इच्छुक नसतील तर लॉर्ड्स कसोटी दरम्यान यावर चर्चा केली जाणार आहे.