महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

द्युती चंदला मिळाला व्हिसा, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना मागितली होती मदत - द्युती चंद भारतीय धावपटू

धावपटू द्युती चंदला विश्व चॅम्पियनशीप स्पर्धांमध्ये पात्रता मिळवण्याची इच्छा आहे. यासाठी तिला युरोपीयन स्पर्धांमध्ये भाग घ्यावे लागणार आहे. तेव्हा तिने या स्पर्धेत भाग घेण्यासाठी अर्ज केला मात्र, तिचा व्हिसा काही कारणास्तव रखडला गेला. यावर तिने जयशंकर यांनी वेळेत व्हिसा मिळवून द्यावे, अशी विनंती ट्विट करुन केली होती.

द्युती चंदला मिळाला व्हिसा, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकरला मागितली होती मदत

By

Published : Aug 10, 2019, 12:47 PM IST

Updated : Aug 10, 2019, 3:16 PM IST

नवी दिल्ली- भारताची स्टार धावपटू द्युती चंद हिने युरोपीयन स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठीच्या व्हिसेसाठी अर्ज केला होता. पण तो अर्ज काही कारणास्तव मिळाला नाही. यामुळे द्युतीने, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना याप्रकरणी मदत करुन वेळेत व्हिसा मिळवून द्यावं, अशी विनंती ट्विटरवरुन केली. तेव्हा परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी द्युतीला तात्काळ व्हिसा मिळवून दिला आहे.

द्युती चंदला विश्व चॅम्पियनशीप स्पर्धांमध्ये पात्रता मिळवण्याची इच्छा आहे. यासाठी तिला युरोपीयन स्पर्धांमध्ये भाग घ्यावे लागणार आहे. तेव्हा तिने या स्पर्धेत भाग घेण्यासाठी अर्ज केला मात्र, तिचा व्हिसा काही कारणास्तव रखडला गेला. यावर तिने जयशंकर यांनी वेळेत व्हिसा मिळवून द्यावे, अशी विनंती ट्विट करुन केली होती.

तेव्हा, परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी द्युतीला तात्काळ व्हिसा मिळवून दिला आहे. याची माहिती तिने, ट्विट करुन दिली. त्या ट्विटमध्ये ती म्हणते, 'माझ्या गरजेच्या वेळी माझ्या पाठीमागे उभे राहिलेल्या सर्वांचे आभार. मला व्हिसा मिळवून देण्यासाठी मदत केलेले भारतीय परराष्ट्र मंत्रालय, एस. जयशंकर, खेळ मंत्रालय, किरन रिजीजू यांच्यासह नवीन पटनायक यांचेही आभार'

आयर्लंड आणि जर्मनी येथे होणाऱ्या आयएएएफ स्पर्धांमध्ये द्युती सहभागी होणार आहे. ही स्पर्धा आयर्लंडमध्ये १३ ऑगस्टला तर जर्मनीमध्ये १९ ऑगस्टला पार पडणार आहे.

Last Updated : Aug 10, 2019, 3:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details