महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

धावपटू द्युती चंदने घडवला इतिहास, ठरली 100 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकणारी पहिलीच भारतीय

100 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकणारी द्युती ही पहिलीच भारतीय खेळाडू ठरली आहे.

भारताची धावपटू द्युती चंदने इटलीत घडवला इतिहास!

By

Published : Jul 10, 2019, 11:28 AM IST

Updated : Jul 10, 2019, 2:53 PM IST

इटली - एकीकडे भारताच्या महिला कुस्तीपटू विनेश फोगट आणि दिव्या काक्रन यांनी स्पेनमध्ये तिरंगा रोवत सुवर्णपदकाची कमाई केली तर दुसरीकडे भारताची आघाडीची धावपटू द्युती चंदने इटलीत इतिहास घडवला. द्युतीने ३० व्या जागतिक युनिव्हर्सिटी गेम्सच्या 100 मीटर शर्यतीमध्ये सुवर्णपदक पटकावत देशाचे नाव उंचावले.

इटली येथे सुरू असलेल्या जागतिक युनिव्हर्सिटी गेम्समध्ये आतापर्यंत एकाही भारतीय खेळाडूला अंतिम फेरी गाठता आली नव्हती. त्यामुळे, या स्पर्धेत 100 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकणारी द्युती ही पहिलीच भारतीय खेळाडू ठरली आहे. स्वित्झर्लंडच्या अँजला डेल पोंटेने ११.३३ सेकंदाच्या वेळासह दुसरा क्रमांक पटकावत रौप्यपदक जिंकले. तर, २३ वर्षीय द्युती चंदने ११.३२ सेकंदाची वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकावला.

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विटरवरून द्युतीचे अभिनंदन केले आहे. द्युतीनेही त्यांचे आभार मानत ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे.

Last Updated : Jul 10, 2019, 2:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details