मुंबई - क्रीडा मंत्रालयाने डोपिंग प्रकरणात प्रतिबंध पूर्ण केलेल्या खेळाडूंविषयी मोठा निर्णय घेतला आहे. डोपिंगमध्ये अडकलेले खेळाडू क्रीडा पुरस्कारासाठी पात्र आहेत, असे क्रीडा मंत्रालयाने म्हटलं आहे. पण यासाठी त्या खेळाडूने प्रतिबंध पूर्ण केलेला असायला हवा. दरम्यान, या निर्णयामुळे बॉक्सिंगपटू अमित पांघल याला फायदा होईल. तो 2012 मध्ये एका प्रकरणामुळे क्रीडा पुरस्कारामध्ये नामांकन मिळवू शकला नव्हता.
क्रीडा मंत्रालयाने या विषयी परिपत्रक जारी केलं आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, डोपिंगमध्ये शिक्षा झालेले खेळाडूंना क्रीडा पुरस्कारासाठी पात्र ठरवण्यात आलं आहे. पण यासाठी त्या खेळाडूची निलंबनाची कारवाई पूर्ण झालेली पाहिजे. दरम्यान, क्रीडा पुरस्काराची घोषणा पुढील काही दिवसांत केली जाण्याची शक्यता आहे.
मंत्रालयाने म्हटलं की, शिक्षा/निलंबन/प्रतिबंधचा कालावधी पुर्ण केल्यानंतर त्या खेळाडूचा विचार पुरस्कारासाठी करण्यात येईल. निलंबन/शिक्षेच्या कालावधी दरम्यान त्याचा विचार केला जाणार नाही. खेळाडूविरोधात तपास सुरू असले तरी देखील त्या खेळाडूचा विचार पुरस्कारासाठी होणार नाही.