नवी दिल्ली -कोरोना व्हायरसचा उद्रेक जगभरात झाला असून क्रीडाविश्वालाही या व्हायरसचा मोठा फटका बसला आहे. या व्हायरसने इटली देशामध्ये हाहाकार माजवला असून एका धावपटूचा या व्हायरसने जीव घेतला आहे.
धक्कादायक!.. पित्यापाठोपाठ मुलाचाही कोरोनामुळे मृत्यू - इटलीचे धावपटू दोनातो साबिया निधन न्यूज
इटलीचे धावपटू दोनातो साबिया यांचे निधन झाले आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. ते ५६ वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी, दोनातो यांच्या वडिलांचेही या व्हायरसमुळे निधन झाले होते.
धक्कादायक!..पित्यापाठोपाठ मुलाचाही कोरोनामुळे मृत्यू
इटलीचे धावपटू दोनातो साबिया यांचे निधन झाले आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. ते ५६ वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी, दोनातो यांच्या वडिलांचेही या व्हायरसमुळे निधन झाले होते. दोनातो यांनी १९८४च्या लॉस एंजलिस ऑलिम्पिकमध्ये पाचवे तर १९८८च्या सोल ऑलिम्पिक स्पर्धेत सातवे स्थान मिळवले होते.