मुंबई - भारताची स्टार महिला वेटलिफ्टर मीराबाई चानूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकत इतिहास रचला. वेटलिफ्टिंगमध्ये चानूने भारताचा 21 वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवला. चानू 49 किलो वजनी गटात हा कारनामा केला.
मीराबाईने टोकियो ऑलिम्पिकच्या दुसऱ्या दिवशी ही कामगिरी केली. तिने स्नॅच आणि क्लिन अॅण्ड जर्क फेरीत मिळून एकूण 202 किलो वजन उचलत पदकाला गवसणी घातली. या कामगिरीनंतर चानूवर देशभरातून शुभेच्छांचा वर्षांव होत आहे.
सर्वसामन्यांपासून नामांकित मान्यवर मीराबाईचे कौतुक करत आहेत. अनेक सरकारी आणि खासगी संस्थांनी तर मीराबाई चानूला बक्षिसाची घोषणा देखील केली आहे. या यादीत एका पिझ्झा कंपनीची भर पडली आहे.
एका नामांकित पिझ्झा कंपनीने मीराबाई चानूला आयुष्यभर पिझ्झा मोफत देण्याची घोषणा केली आहे. पिझ्झा कंपनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर यांची घोषणा केली.